Pune Ring Road News: मोठी अपडेट! मंत्री दादा भुसेंनी पुणे रिंग रोडबद्दल विधानसभेत दिली माहिती; कामाला निर्णायक गती

पुणे रिंग रोडसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांना वेग देण्यासाठी प्रशासनाने निर्णायक पाऊले उचलली आहेत, असे मंत्री भुसे म्हणाले.

Pune Ring Road News: मोठी अपडेट! मंत्री दादा भुसेंनी पुणे रिंग रोडबद्दल  विधानसभेत दिली माहिती; कामाला निर्णायक गती

Pune Ring Road News : पुणे शहर (Pune City) आणि परिसरातील वाहतूक कोंडी फोडून सुरळीत करण्यासाठी हाती घेतलेल्या रिंग रोड (Pune Ring Road) प्रकल्पाबद्दल महत्त्वाची माहिती मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी विधानसभेत दिली. रिंग रोडच्या पूर्व भागाचे काम 2028 पर्यंत, तर पश्चिम भागाचे काम 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येईल. याशिवाय, हडपसर-लोणी काळभोर मेट्रो (Pune Metro) मार्गाच्या कामाची व्यवहार्यता तपासली जात आहे. पुणे-शिरूर उन्नत मार्गालाही मंत्रीमंडळाची मान्यता मिळाली आहे.

रिंग रोडच्या कामाला निर्णायक गती
आमदार राहुल कुल यांनी पुण्यातील रिंग रोड आणि इतर प्रकल्पांसंदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित केले होते. या लक्षवेधी चर्चेत आमदार सुनील शेळके आणि अभिजित पाटील यांनीही सहभाग घेतला. पुणे रिंग रोडसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांना वेग देण्यासाठी प्रशासनाने निर्णायक पाऊले उचलली आहेत, असे मंत्री भुसे म्हणाले.

पूर्व रिंग रोड: पूर्व भागातील बारापैकी नऊ पॅकेजेसची कामे वेगाने सुरू असून, उर्वरित तीन पॅकेजेस प्रशासकीय मान्यतेच्या प्रक्रियेत आहेत.
निविदा प्रक्रिया: या तिन्ही पॅकेजेसची निविदा प्रक्रिया पुढील वर्षी मे महिन्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल आणि ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

हेही वाचा – Nitin Gadkari: पुणे ते छत्रपती संभाजीनगर सहा तासांचा प्रवास आता दोन तासांत, गडकरींचा मेगाप्रोजेक्ट जाहीर

जिल्ह्यातील इतर उन्नत मार्गांना मान्यता
रिंग रोडव्यतिरिक्त पुण्यात इतर प्रकल्पांनाही मान्यता मिळाली आहे. राज्याच्या एमएसआयडीसी या विभागाकडून ही कामे करण्यात येणार आहेत.
हडपसर ते यवत उन्नत मार्ग: याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पुणे ते शिरूर उन्नत मार्ग: या मार्गाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
शिरूर-छत्रपती संभाजीनगर प्रकल्प: या ग्रीनफिल्ड (Greenfield) प्रकल्पासाठी भूसंपादन पूर्ण करण्यात आले आहे.
तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्ग: हा उन्नत मार्ग करण्याचे प्रस्तावित असून, त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू आहे.

मेट्रो प्रकल्पांना गती आणि समन्वय
महामेट्रोकडून सुमारे बारा किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाला मंजुरी मिळाली असून, त्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. उड्डाणपूल आणि रस्ता क्रॉसिंगसारख्या तांत्रिक अडचणींसाठी अधिकाऱ्यांनी स्वतंत्र बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भातील व्यवहार्यता तपासल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील अपघातांवर तोडगा, ट्रॉमा केअर सेंटर उभारणीचा निर्णय

उच्चस्तरीय आढावा आणि तातडीचे निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांमध्ये समन्वय ठेवून प्रकल्पांच्या परवानग्या, भूसंपादन आणि कामांची गती यावर दर महिन्याला आढावा घेण्याचे आदेश दिला आहे, असे भुसे म्हणाले. त्याचवेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर-पुणे रस्त्यासंदर्भात बैठक झाली असून हे काम तातडीने सुरू करण्यात येईल, अशी माहिती या वेळी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number