पुणे : पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातून एसटी बसच्या तोडफोडीची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. कारला एसटी बसचा धक्का लागल्याच्या कारणामुळे संतप्त झालेल्या कारचालकाने बसवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे काही वेळ संबंधित परिसरात तणावाचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
ST बसचा प्रवास ठरला थरारक
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दिशेने जाणारी एसटी बस ही चाकण परिसरातून जात असताना बसचा एका कारला धक्का लागला. या घटनेनंतर कारचालक संतत्प झाला. त्यानंत बसचालकाशी वाद घालत असतानाच बसची तोडफोड केल्याचे सांगितले जात आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बसमधील प्रवाशांमध्ये काही वेळासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले .
प्राथमिक माहितीमध्ये, कारचालकाने एसटी बसच्या चालकाला मारहाण केल्याचीही आरोप करण्यात आलेला आहे. तसेच बसमधील असलेल्या काही प्रवाशांची गैरवर्तन करत शिवीगाळ केल्याचीही माहिती समोर येत आहे. बसची तोडफोड सुरु झाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली होती. मात्र, नेमक्या कोणत्या कारणावरुन हा वाद वाढला याबाबतची अधिक माहिती पोलिसांच्या तपासानंतर समोर येईल.
चाकण राडा प्रकरणी पोलिसांची एन्ट्री
घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी तातडीने बोलवण्यात आले. पोलिसांनी सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला असून संबंधित व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती आहे.