Thursday, November 13, 2025 08:42:40 AM

Radhakrishna Vikhe Patil Meet Manoj Jarange : आरक्षणाचा तिढा सुटणार?; विखे पाटलांनी घेतली मनोज जरांगेची भेट, दोघांमध्ये सव्वातास बंद दाराआड चर्चा

मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अचानक अंतरवाली सराटीत दाखल होत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.

radhakrishna vikhe patil meet manoj jarange  आरक्षणाचा तिढा सुटणार विखे पाटलांनी घेतली मनोज जरांगेची भेट दोघांमध्ये सव्वातास बंद दाराआड चर्चा

आंतरवाली सराटी : मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अचानक अंतरवाली सराटीत दाखल होत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. दोघांमध्ये बंदरावर बंद दाराआड तब्बल सव्वा तास चर्चा झाल्याचे समजते. गेल्या महिन्यात, 2 सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या जीआरवरून ओबीसी समाजाचा वाढता विरोध लक्षात घेता दोघांमध्ये चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बुलढाण्याहून संभाजीनगरकडे जाताना अचानक राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपला मोर्चा अंतरवाली सराटीकडे वळवला. मनोज जरांगे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वागत केले. दोघांमध्ये सरपंचाच्या घरी बंद दाराआड चर्चा सुरू झाली.

या भेटीसंबंधी विखे पाटील म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या तब्येतीची आपण विचारपूस केली. तसेच झालेल्या सरकारच्या निर्णयाबद्दल अंमलबजावणी बद्दलही चर्चा झाली. परंतू ही भेट वैयक्तित पातळीवरीलो होती. पुढे ओबीसी आरक्षणाबाबत विखे पाटील म्हणाले की, छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याशी चर्चा करायला काही हरकत नाही. माझी पहिल्यापासून भूमिका होती. ओबीसीला आरक्षण दिलं गेलं, त्यावेळी मराठा समाजाने कधी आक्षेप घेतला का?, मेळावे घेतले का?, कधी मोर्चे काढले का?, मराठा समाजाने सगळ्यांना सांभाळून घेतलं आहे. मराठा समाजाला आता वाटतं की मनोज जरांगेंप्रमाणे आता आपण सगळ्यांनी एक भूमिका घेतली पाहिजे. ते त्याला विरोध का करतात, हेच मला समजेना. कृपया विरोध करणे सोडून द्या, प्रक्रिया पुढे जाऊ द्या, तुमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागत नाही, तुमच्या आरक्षणात कोणी आरक्षण मागत नाही, असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा : Air Ambulance Service : आपत्कालीन वैद्यकीय सेवांना बळकटी! महिनाभरात राज्यात दोन एअर अॅम्ब्युलन्स होणार सुरू; 200 अपग्रेडेड रोड अॅम्ब्युलन्सचाही समावेश

1994 ला शरद पवारसाहेबांनी मंडल आयोग लागू करत असताना, त्यावेळी मराठा समाजाचा समावेश केला असता तर हा प्रश्न आलाच नसता. खरंतर राज्यात सामाजिक विषमता तयार करण्याला जबाबदार शरद पवारसाहेब आहेत. मराठा समाज आज मोर्चा काढतोय, आम्ही कधी म्हणत नाही 1994 चा निर्णय बदला. 1994 च्या निर्णयांमध्ये अंमलबजावणी वेगळे करावा. 1994 ची भूमिका बदलायचं असती तर कदाचित ओबीसी नेत्यांचा आक्षेप मी घेतला असता. त्याचा आणि आमचा कुठलाही संबंध येत नाही, असेही विखे पाटील यांनी नमूद केले. 


सम्बन्धित सामग्री