राहुल कनालाचा शिवसेनेत पक्षप्रवेश

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जाणारे राहुल कनाल यांनी उबाठा शिवसेना गटाला जय महाराष्ट्र केला आहे. कनाल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी आयकर विभागाच्या पथकाने राहुल कनाल यांच्या घरी छापा मारला होता, पण त्यात काही निष्पन्न झालं नव्हतं. अशा परिस्थितीतही राहुल कनाल यांनी आदित्य […]

राहुल कनालाचा शिवसेनेत पक्षप्रवेश

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जाणारे राहुल कनाल यांनी उबाठा शिवसेना गटाला जय महाराष्ट्र केला आहे. कनाल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी आयकर विभागाच्या पथकाने राहुल कनाल यांच्या घरी छापा मारला होता, पण त्यात काही निष्पन्न झालं नव्हतं. अशा परिस्थितीतही राहुल कनाल यांनी आदित्य ठाकरेंची साथ सोडली नव्हती. मात्र आदित्य राजकारणात व्यस्त असल्याचा फायदा घेत काही युवासेनेचे पदाधिकारी आपल्याला डावलत असल्याचा आरोप करत कनाल यांनी ठाकरेंना रामराम केला आहे.

राज्याच्या उत्तुंग विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे राहुल कनाल यांनी म्हटले आहे. यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या युवासेना कोअर कमिटीतील पूर्वेश प्रताप सरनाईक, समाधान सदा सरवणकर, योगेश रामदास कदम, सिद्धेश कदम, अमेय घोले यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. प्रवेशावेळी सर्वांचा रोष हा युवासेनेच्या काही पदाधिकाऱ्यांवर होता. आता राहुल कनाल यांना देखील डावलण्यात आल्याचा दावा केला जात आहे. स्वाभिमानासाठी राहुल कनाल यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केल्याची चर्चा आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number