Raigad Crime News: रायगड हादरले! खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीला संपवलं; सकाळच्या सुमारास घडला थरार

सकाळच्या वेळेत ही घटना घडली असून पोलिस विविध अंगाने चौकशी करत आहेत. घटनेमुळे परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Raigad Crime News: रायगड हादरले! खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीला संपवलं; सकाळच्या  सुमारास घडला थरार

रायगड: रायगड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली असून खोपोली शहरात नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मंगेश काळोखे यांची हत्या करून त्यांचा मृतदेह रस्त्यावर फेकून दिल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकारामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

ही घटना खोपोलीतील साईबाबा नगर परिसरात घडली. मंगेश काळोखे हे शिवसेनाचे कार्यकर्ते होते. मृतदेह आढळताच घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश काळोखे हे नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती असून, आज सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. ते आपल्या मुलांना शाळेत सोडून परत येत असताना हा हल्ला झाला.

हेही वाचा: Bangladesh Violence: मोहम्मद युनूसची ती एक चूक, ज्याची किंमत आज बांगलादेश मोजतोय

प्रत्यक्षदर्शी माहितीनुसार, काळ्या रंगाच्या वाहनातून हल्लेखोर घटनास्थळी आले होते. त्यांच्या तोंडावर काळ्या रंगाचे कपडे बांधलेले होते. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले आहेत.

या प्रकरणाचा तपास खोपोली पोलीस करत असून, वेगवेगळ्या शक्यतांचा विचार करून तपास सुरू आहे. रायगडचे पोलीस अधीक्षक स्वतः घटनास्थळी दाखल होणार असून तपासाला अधिक गती देण्यात येणार आहे. ही हत्या राजकीय कारणातून झाली की आर्थिक वादातून, याचा उलगडा तपासातून होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे निवडणुकीपूर्वीच काळोखे कुटुंबाने शिवसेनेत प्रवेश केला होता, त्यामुळे या हत्येच्या पार्श्वभूमीवर विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
या गंभीर घटनेमुळे रायगड जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

हेही वाचा: Year Ender 2025 : 2025 मध्ये लग्नबंधनात अडकलेली लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number