Bharat Gogawale Reaction : कॅशबॉम्ब व्हिडीओवर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया, म्हणाले, ‘माझ्याकडे पैसा…’

गोगावलेंचा व्हिडिओ समोर आल्याने रायगडचे राजकारण चांगलेच पेटले आहे. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना गोगावले यांनी या प्रकरणाची व्यवस्थित चौकशी व्हावी, असे म्हटले आहे.

Bharat Gogawale Reaction : कॅशबॉम्ब व्हिडीओवर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया, म्हणाले, ‘माझ्याकडे पैसा…’

Bharat Gogawale Reaction on Cash : शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचा नोटांच्या बंडलांसह व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांनी त्यावर नागपूरमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) प्रवक्त्या चित्रलेखा पाटील (Chitralekha Patil) यांनी हा व्हिडिओ प्रसिद्ध करत गोगावलेंकडून एवढे पैसे कुठून आले, असा प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना गोगावले म्हणाले की, "माझ्याकडे एवढा पैसा असता तर मी मुंबईत घर घेतलं असतं, अजूनही माझं मुंबईत घर नाही."

आरोपांची चौकशी खुशाल करा
भरत गोगावलेंनी चित्रलेखा पाटील यांनी केलेल्या आरोपांची चौकशी खुशाल करावी, आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, "गेल्या 40 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत आपल्यावर आरोपांचा एक ओरखडाही नाही." ते पुढे म्हणाले की, "असे आरोप होत राहणार, विरोधक आहेत ते. मात्र त्यांनी केलेल्या आरोपाचा पुरावा द्यावा, अन्यथा मलाही कायदेशीर नोटीस बजावावी लागेल."

नोटांच्या स्रोतावर प्रश्नचिन्ह
गोगावलेंचा व्हिडिओ समोर आल्याने रायगडचे राजकारण (Raigad Politics) चांगलेच पेटले आहे. चित्रलेखा पाटील यांनी गोगावलेंकडून एवढे पैसे कुठून आले, असा प्रश्न विचारत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. भरत गोगावलेंनी चित्रलेखा पाटील यांच्या आरोपांमागे तटकरे की आणखी कुणाचा हात आहे, हे आताच सांगता येणार नाही, असे मत व्यक्त केले. ते म्हणाले की, या प्रकरणाची व्यवस्थित चौकशी व्हावी, मग त्यावर उत्तर देईन.

हेही वाचा – Bharat Gogawale Cash Video : शिंदेंच्या अडचणी वाढल्या, आधी महेंद्र दळवी आता गोगावलेंचा व्हिडीओ समोर, 2 नेत्यांवर कॅश बॉम्बचा आरोप

रायगडमध्ये वाढलेला राजकीय संघर्ष
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी टाकलेला 'व्हिडिओ बॉम्ब' (Chitralekha Patil Video Bomb) आणि चित्रलेखा पाटील यांनी समोर आणलेल्या भरत गोगावलेंच्या व्हिडिओमुळे रायगडचे राजकारण चांगलेच तापले आहे. रायगडच्या महायुतीत गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना (NCP vs Shiv Sena) असा संघर्ष होताच; त्यात या व्हिडीओमुळे नवी ठिणगी पडली. यात शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) आणि महेंद्र थोरवे विरुद्ध राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) अशी जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.

'संत' आणि 'देशभक्त' यावरून टोलेबाजी
या वादात संत आणि देशभक्तांवरून एकमेकांवर शेरेबाजी करण्यात आली. तटकरेंनी दळवी निरागस असून ते देशभक्त असल्याचा उपरोधिक टोला लगावला. तर दळवींनी तटकरे राजकारणातील संत आहेत, असा प्रतिटोला लगावला. अंबादास दानवेंच्या व्हिडिओमध्ये नोटांच्या बंडलांसहित एक लाल टी-शर्ट वाला व्यक्ती दिसत आहे, पण तो नेमका कोण आहे याबाबत स्पष्टता नाही. या व्हिडिओमुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा (Political Allegations and Counter-allegations) अक्षरशः महापूर आल्याचे चित्र आहे.

हेही वाचा – Maharashtra Governmnet On Liquor shop : मद्यविक्रीच्या दुकानांसाठी सरकारचे नवे नियम, अजित पवारांनी केली मोठी घोषणा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number