महानगरपालिका निवडणुकांदरम्यान रागडमधील म्हसळा नगरपंचायतीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले 7 नगरसेवक अपात्र ठरल्याचा प्रकार रागडमधून समोर आला आहे. दिवंदत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेमना एकनाथ शिंदे यांच्या गटात पक्षप्रवेश केलेल्या सात नगरसेवकांना अपात्र करण्यात येत असल्याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. म्हसळा नगरपंचायतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल सात नगरसेवकांनी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला होता.
हेही वाचा- Neral Khopoli : नेरळमध्ये प्रचाराच्या वादातून जीवघेणा चाकूहल्ला; शिवसेना माजी जिल्हाध्यक्षाचे नाव समोर
त्यानंतर रागडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गटनेते संजय कर्णिक यांच्या मदतीने रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे पक्षांतराविरोधात कायदेशीर अपात्रतेचा अर्ज दाखल केला होता. यानंतर पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी या सातही नगरसेवकांचे सदस्यत्व आज रद्द केले आहेत. यामुळे आता म्हसळा नगरपंचायतीत राजकीय भूकंप झाल्याचे पाहायला मिळत आहे.