Tuesday, November 11, 2025 11:14:28 PM

Balasaheb Thorat on Fake Voter List: राज्यातील मतदारयादीत गोंधळ; राज ठाकरें पाठोपाठ बाळासाहेब थोरातांचा निवडणूक आयोगावर निशाणा

बोगस मतदारांचा मुद्दा जोरदार गाजत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोगस नावे मतदारयादीत समाविष्ट झाल्याचा आरोप केल्यानंतर, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

balasaheb thorat on fake voter list राज्यातील मतदारयादीत गोंधळ राज ठाकरें पाठोपाठ बाळासाहेब थोरातांचा निवडणूक आयोगावर निशाणा

राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोगस मतदारांचा मुद्दा दिवसेंदिवस गाजत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच राज्यातील मतदारयादीत तब्बल ९६ लाख बनावट मतदारांची भर घातली गेली असा गंभीर आरोप केल्यानंतर, काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही या विषयावर निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.

थोरात यांनी म्हटलं आहे की, “राज्यातील मतदारयादींमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ आणि अनियमितता दिसून येत आहे. काही ठिकाणी बाहेरच्या लोकांची नावं मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. हे सर्व हेतूपुरस्सर केलं जात असून, त्यामागे निवडणूकपूर्व राजकीय डावपेच आहेत.” त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, “जिल्हा परिषदेतील मतदार नगरपालिकेत आणि नगरपालिकेतील मतदार जिल्हा परिषदेच्या याद्यांमध्ये घालण्यात आले आहेत. हा घोळ डिजिटल युगातही घडवून आणला जात आहे, हे लोकशाहीसाठी लज्जास्पद आहे.”

हेही वाचा : Raj Thackeray: 'राज्यात 96 लाख खोटे मतदार याद्यांमध्ये भरण्यात आले', राज ठाकरेंचा गंभीर आरोप

थोरात यांनी स्पष्ट केले की, “मतदारयादींची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. निवडणुकांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. आज मतदारयादींचा गैरवापर निवडणुकीतील एक मोठी योजना बनली आहे.”

दरम्यान, गोरेगाव येथे झालेल्या मनसे पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर थेट हल्ला चढवला होता. त्यांनी म्हटले होते की, “राज्यात निवडणुकांपूर्वी मतदार यादींमध्ये ९६ लाख खोट्या मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. ही मोठ्या प्रमाणातील धांदल लोकशाही प्रक्रियेवर आघात करणारी आहे.”

सध्या या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. एका बाजूला मनसे तर दुसरीकडे काँग्रेस निवडणूक आयोगावर टीका करत आहे.

हेही वाचा: Raj Thackeray On EC: 'तुम्ही फक्त महाराष्ट्रात निवडणुका घेऊन दाखवा...'; राज ठाकरेंचं निवडणूक आयोगाला थेट आव्हान


सम्बन्धित सामग्री