Ramesh Pardeshi Join BJP : मनसेला धक्क्यांवर धक्के! पुण्यात ऐन निवडणुकीत बड्या नेत्याने कमळ हाती घेतले

एकीक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकां जोरदार तयारी सुरु असताना दुसरीकडे मनसे नेते राज ठाकरे यांना मात्र धक्क्यांवर धक्के मिळत आहेत. मनसेसाठी पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

Ramesh Pardeshi Join BJP : मनसेला धक्क्यांवर धक्के! पुण्यात ऐन निवडणुकीत बड्या नेत्याने कमळ हाती घेतले

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे वारे जोराने वाहत आहेत. अशातच मनसे आणि मविआच्या अनेक नेत्यांनी महायुतीमध्ये पक्षप्रवेश केला आहे. एकीक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकां जोरदार तयारी सुरु असताना दुसरीकडे मनसे नेते राज ठाकरे यांना मात्र धक्क्यांवर धक्के मिळत आहेत. मनसेसाठी पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. 'मुळशी पॅटर्न' चित्रपट फेम पिट्या भाईने म्हणजेच अभिनेते रमेश परदेशी यांनी कमल हाती घेतलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील आणि पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर याबद्दलची माहिती दिली. यावेळी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वेशात होते आणि त्यांनी 'राष्ट्र प्रथम' असं कॅप्शन देत आपला फोटो शेअर केला होता. रमेश परदेशी हे मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष होते. 

पक्षप्रवेश केल्यानंतर रमेश परदेशी यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली यावेळी ते म्हणाले की, "मी भारतीय संघाचा स्वयंसेवक आहे. माननीय राज ठाकरे साहेब यांच्यासोबत मी गेले वीस वर्षे काम करत आहे. बदललेली परिस्थिती कलाकारांना आणि मराठी सिनेमांना न्याय देण्यासाठी आणि कुठेतरी माझ्यावरती असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार मला खुणावत होते म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे मराठी सिनेमा आणि त्याच्याशी संबंधित असलेला ज्या काही अडचणी असतील त्या राज्य शासनाने केंद्राच्या माध्यमातून मी सोडवण्याचा प्रयत्न करेल. राज साहेबांनी सुनावलं असं काही नाही पण ते कुटुंब प्रमुख आहेत. प्रश्न हा संसाराचा आणि तत्वांचा आहे. आजच पक्षप्रवेश केलेला आहे त्यामुळे पुढे पाहू."

राज ठाकरेंनी रमेश परदेशी यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशातील फोटो पाहिल्यानंतर राज ठाकरेंनी त्यांना बैठकीदरम्यान एकनिष्ठ राहण्याचा सल्ला दिला होता. तसेच ते पुढे म्हणाले होते की "छाती ठोकपणे सांगतो मी संघाचा कार्यकर्ता आहे, असं म्हणताय तर मग इथे कशाला टाईमपास करायला आलात? एकाच ठिकाणी कुठेतरी राहा". असं राज ठाकरे म्हणाले होते. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number