Friday, February 13, 2026 06:32:16 PM

Ajit Pawar Death : "मीडियाआधी ही माहिती मला समजली" अजित पवारांच्या अपघातानंतर पहिला कॉल कोणाला?

सकाळी 11 वाजता अजित पवारांच्या पार्थिवावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार केले गेले. याचपार्श्वभूमिवर माजी मंत्री आणि शरद पवार गटातील ज्येष्ठ नेते राजेश टोपे यांनी मोठा खुलासा केला आहे.

ajit pawar death  quotमीडियाआधी ही माहिती मला समजलीquot अजित पवारांच्या अपघातानंतर पहिला कॉल कोणाला

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. बारामतीत आज त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असून वातावरण अतिशय भावूक झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज अजित पवारांना निरोप देण्यासठी त्यांच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह देश–राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते, प्रशासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. काल 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात अखेरचा श्वास घेतला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीकडे येत असताना पुणे–बारामती परिसरात त्यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली. ज्यात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर काल अजित पवार यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात रात्री 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत ठेवण्यात आले होते. त्यानंतर आज, गुरुवारी सकाळी 6 ते सकाळी 9 वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार केले गेले. याचपार्श्वभूमिवर माजी मंत्री आणि शरद पवार गटातील ज्येष्ठ नेते राजेश टोपे यांनी मोठा खुलासा केला आहे. 

हेही वाचा- Ajit Pawar Last Call: “किरण, मला आता या सगळ्याचा कंटाळा आलाय..." अपघातापूर्वी दादांनी मित्राजवळ केलं होतं मन मोकळं
अजित पवार यांच्या निधनाची माहिती माध्यमांकडे पोहचण्याआधी त्यांना समजली होती. असा दावा राजेश टोपे यांनी केला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर आज त्यांच्या बाबत बोलताना राजेश टोपे अश्रूंना आवर घालत म्हणाले की, "आमच्या जिल्ह्यातील एक तरुण बारामती विमानतळावर स्टोअर रूममध्ये काम करतो. त्याने सकाळी फोन करून सांगितले की अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आहे. विमानाचा शेवटचा भाग फक्त दिसतोय, उर्वरित सगळं जळून खाक झालं आहे. माध्यमांकडे ही बातमी पोहोचण्याआधीच मला फोन आला होता. आज माझा वडीलधारा भाऊ गेल्यासारखी भावना आहे", अशी भावनिक प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली. 

हेही वाचा- Plane Crash : अजित पवारांच्या विमान अपघाताशी साम्य असलेली आणखी एक दुर्घटना; खासदारासह 15 जणांचा करुण अंत
कोण आहेत राजेश टोपे?
राजेश पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील नेते असून ते 2029 साली ते महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. राजेश टोपेंनी करोना काळात रस्तावर उतरुन काम केलं. 2004, 2009, 2014, 2019 ला घनसावंगी मतदारसंघातून सलग पाच विधानसभा निवडणुकीत विजयी झालेत.  


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या