आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे या दोन्ही शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त शिवसेना ठाकरे गटातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. सध्या राज्यभरात गाजलेला विषय म्हणजे ऑपरेशन टायगरमुळे ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. अशातच शिवसेना शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. रामदास कदम यांनी सुरुवातीला शिवसेनेच्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा देत मोठा खुलासा केला आहे. ठाकरेंचा 6 नाही तर 7 खासदार फुटल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना तोंड फुटले असून, तो सातवा खासदार नेमका कोण याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
"6 खासदार बाहेर गेलेत, 10 लोकांची मंत्रीपद सोडत बाहेर गेले होते. संजय राऊत यांना हे समजत नाही. गुलाबराव पाटील यांनी हात जोडून विनंती केली होती 20 आमदारांसोबत, मात्र उद्धव ठाकरेंनी गेटआऊट केलं. लोकं का जातात? याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मी दाव्याने सांगतो राऊत फक्त प्रसिद्धीसाठी बोलतात. ऐकावे जनाचे करावे मनाचे, आमची बैठक घ्यायचे बाळासाहेब ठाकरे. सगळ्यांची मतं घ्यायचे, विचाराचे आणि मग ते स्वतः निर्णय घ्यायचे. उद्धव ठाकरे आपण कधी बैठका घेतल्यात का? ही वेळ का येते? उद्धवजी, हे लोकं तुम्हाला फसवत आहेत. सातव्या खासदाराची देखील सही आहे. तो माणूस बाजूला बसला होता, मंत्री पद मागत होता. डोलारा खाली आला आता सगळा. 7 वा खासदार देखील आहे, उद्धव जींना बघायचं, त्यांची देखील सही आहे. आमदार नक्कीच येतील का, मुंबईचे नगरसेवक देखील सोबत येतील.. मुंबईचे 25 नगरसेवक संपर्कात आहेत.. आमदारांचे आज काही बोलणार नाहीत, मात्र ते आमदार उद्धव ठाकरेंजवळ 2029 पर्यंत शिल्लक राहणार नाहीत.." रामदास कदम यांनी केलेल्या या खुलाशानंतर 'ऑपरेशन टायगर' प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आधीच ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष तीव्र असताना, सातव्या खासदाराचा उल्लेख करून रामदास कदम यांच्या दाव्यामुळे ठाकरे गटातील अंतर्गत घडामोडी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.
आदित्यसाठी पक्षाची वाट लावली- रामदास कदम
"एकनाथ शिंदे होते म्हणून शिवसेना वाचली. याचा अभिमान आम्हाला वाटतो, उद्धवजी अजूनही वेळ गेली नाही. फक्त आदित्यसाठी पक्षाची वाट लावली आहे. त्याला आम्ही साहेब म्हणायचं. माझ्या चेंबुरला आदित्य यायचे तेव्हा मी उठायचो खुर्ची द्यायचो. मात्र मला काय माहिती होतं ते माझंच मंत्रीपद घेतील. मातोश्री आमचं मंदिर होतं, खूप वाईट वाटलं. ही आजची वेळ का यावी, का सगळे बाहेर पडलेत. रामदास कदम यांची भाषणं ऐकायला मिळायची, गुलाबराव पाटील माझी भाषणं बंद केली बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर…उद्धव ठाकरेंनी स्वत: मातोश्रीवरुन बाहेर पडावं.. एकनाथ शिंदे खूप पुढे गेले आहेत. ते आता जगात मोठे होतील हो…"
हेही वाचा- Omraje Nimbalkar First Reaction : "…त्यानंतर माझी भूमिका जाहीर करणार" ओमराजे निंबाळकर शिंदेंनाही 'धप्पा' देण्याच्या तयारीत?
उद्धव ठाकरेनी कॉंग्रेससोबत जाऊन बाळासाहेब ठाकरे यांचे विचार बुडवले- रामदास कदम
"आजूबाजूचे उद्धव ठाकरेंची लोकं त्यांना फसवत आहेत. उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसणाऱ्याची सही आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेससोबत गेलेत तेव्हाच बाळासाहेब ठाकरे यांचे विचार बुडवलेत. आमदारांनी खासदारांना कामं करण्यासाठी निधी मिळणार नसेल तर राजकीय अस्तित्व धोक्यात येणार आहे ना… उद्धव ठाकरेंसोबत राहात निधी मिळणार नसतील तर काय.. संजय राऊत साहेब यांना नियम माहिती नाही… वेगळ्या गटाची परवानगी मिळाली तर मान्यता देता येते ते नियमित होतात. गट एकदा झाला तर मग पक्षप्रवेश करता येतो. यांनी शिव्या घालायला सुरुवात केली तेव्हा सगळे खासदार गेले देखील नव्हते. सुरतला आमदार गेले नव्हते त्यांची आयमाय काढत होते."
"मी पहिल्यांदाच बोललो आहे ना, तलवार मी नाही चालवत, पत्रकार म्हणून तुम्हाला खरं सांगितलं उद्धव ठाकरेंना कळावं म्हणून बोललो. खासदार आपल्या मतदारसंघात जातील, त्यांचे बाल पण का ही करु शकणार नाही. ह्या सगळ्या खासदारांचे जल्लोषात स्वागत होईल. आता पुतळा जाळत आहात, पुढे हजारोंची गर्दी असेल स्वागताला. आपली लोकं का जातायत. संदीप देशपांडेंचा सल्ला घेत उद्धव ठाकरेंनी पुढे गेले पाहिजे. राज ठाकरेंनी स्टेटमेंट दिले आपल्या भावासाठी… मला बरं वाटलं… उद्धव ठाकरेंच्या बाजूने राज ठाकरे बोलले. आमदारांच्या मतांवर खासदार झाला आहात मग संजय राऊत पण गद्दार असं म्हणायचं का? गद्दारांची व्याख्या काय? 40 आमदार बाहेर पडतात तेव्हा आपण आत्मपरीक्षण करायला पाहिजे. ओमराजेंना न्याय मिळाला पाहिजे यात दुमत नाही. मात्र ते का सोडून जातात याचे आत्मपरीक्षण करायला हवं."