Tuesday, May 20, 2025 03:31:18 PM

Ranjeet Kasale: रणजीत कासलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी; अॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल

निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले सध्या चर्चेत आहे. त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. आता या प्रकरणात कासलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ranjeet kasale रणजीत कासलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी अॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल

बीड : निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले सध्या चर्चेत आहे. एकापोठापाठ एक व्हिडीओ पोस्ट करत त्याने धनंजय मुंडेंसह पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप केले होते. मात्र आज बीड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. आता या प्रकरणात कासलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

कासलेचे मुंडेंवर कोणते गंभीर आरोप? 
सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले याने माजी मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. वाल्मिक कराड मुंडेंना नकोसा झाल्याने त्याच्या एन्काऊंटरची सुपारी देण्यात आल्याचे खळबळजनक दावा कासलेने केला. कराडच्या मागे बंदुक घेऊन थांब आणि गडबड वाटल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. याचा अर्थ कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती  असेही त्याने म्हटले आहे. धनंजय मुंडे चुकीच्या मार्गानं निवडणूक जिंकले. निवडणुकीच्या दिवशी माझ्या खात्यावर 10 लाख जमा झाले. ईव्हीएममध्ये छेडछाडीवेळी दूर राहण्यासाठी पैसे देण्यात आले. संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनीतून माझ्या पगाराच्या खात्यात पैसे आले. लोकसभेला बोगस मतदान करू दिलं नव्हतं, विधानसभेत शांत राहण्यासाठी पैसे देण्यात आल्याचा गंभीर आरोप कासलेने धनंजय मुंडेंवर केला आहे. 

हेही वाचा : बीडमध्ये वकील महिलेला अमानुष मारहाण; सरपंचासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल

विमानतळावर उतरताच कासले बडतर्फ 
विमानतळावर उतरताच कासलेला बडतर्फ करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले यांनी पदास न शोभणारे वर्तन केले असून त्यांनी केलेल्या चुकीच्या, बेताल व जेबाबदार वक्तव्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे माननीय पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांनी बुधवारी 17 एप्रिल रोजी आदेश काढून  सेवेतून बडतर्फ केले आहे. वादग्रस्त पोलिस अधिकारी रणजीत कासलेला पोलीस दलातून बडतर्फ करण्याचे आदेश संभाजीनगर पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांनी दिले आहेत. बीड पोलिसांनी आज पहाटे कासलेला अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. कासलेवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. बीड न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

कासलेने गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एकापाठोपाठ एक व्हिडीओ पोस्ट करत आपल्यावर अन्याय होत असल्याचा दावा करत आहे. त्याने पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि काही राजकीय नेत्यांवरही थेट आरोप करत खळबळ माजवली. विशेष म्हणजे, त्याने वाल्मीक कराड या आरोपीच्या एन्काउंटरसाठी आपल्याला विचारणा झाल्याचा दावाही केला. अशा प्रकारच्या गंभीर विधानांमुळे कासले सातत्याने चर्चेत राहिला. याच व्हिडीओंपैकी एका व्हिडीओत त्याने एका समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्याच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 


सम्बन्धित सामग्री