रत्नागिरी : हंगामापूर्वीच रत्नागिरी हापूस आंब्याचे बाजारात आगमन झाल्याने आंबाप्रेमी ग्राहक सुखावले आहेत. तब्बल चार महिने आधीच रत्नागिरी हापूसचे बाजारात आगमन झाले आहे. गावखडी येथून रत्नागिरी बाजारात हापूसची पहिली पेटी दाखल झाली आहे. दत्ताराम पड्यार यांच्या बागेतील आंबे ऑक्टोबरमध्येच तयार असून जुलै महिन्यात आलेल्या मोहोरातून तयार झालेला हा आंबा आहे. चार डझन आंब्यांची पेटी विक्रीसाठी बाजारात दाखल झाली असून हापूसला डझनामागे सहा हजार रुपयांचा दर तर पेटीचा भाव २१ हजार रुपयांच्या घरात असल्याचे समजते. याबाबत आंबा विक्रेते सतीश पोवार यांनी माहिती दिली आहे.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर