Rana VS Thakur : ‘यशोमती ठाकूर सहा महिन्यात भाजपात प्रवेश करतील, ही काळ्या दगडावरील रेष’; राणांना वार, यशोमथी ठाकूर यांनीही केला पलटवार

सुरेंद्र आकोडे, प्रतिनिधी अमरावती : हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे, हे काँग्रेसचे लोकांनाही माहीत नाही. चिखलदरा कुठे आहे. चिखलदरामधील लोकांच्या मूलभूत गरजा काय आहे, याचा अभ्यास हर्षवर्धन सपकाळ यांना नाही, असा आरोप रवी राणा यांनी केला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून चिखलदऱ्याचा विकास सुरू आहे, तो विकास आणखी वाढवायचा आहे. त्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांनी चर्चा […]

Rana VS Thakur : ‘यशोमती ठाकूर सहा महिन्यात भाजपात प्रवेश करतील, ही काळ्या दगडावरील रेष’; राणांना वार, यशोमथी ठाकूर यांनीही केला पलटवार

सुरेंद्र आकोडे, प्रतिनिधी

अमरावती : हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे, हे काँग्रेसचे लोकांनाही माहीत नाही. चिखलदरा कुठे आहे. चिखलदरामधील लोकांच्या मूलभूत गरजा काय आहे, याचा अभ्यास हर्षवर्धन सपकाळ यांना नाही, असा आरोप रवी राणा यांनी केला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून चिखलदऱ्याचा विकास सुरू आहे, तो विकास आणखी वाढवायचा आहे. त्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांनी चर्चा करून भाजपाच्या अल्हाद कलोती यांना पाठिंबा दिला. चिखलदरामधील काँग्रेसचे नऊ ते दहा उमेदवार चिखलदऱ्यात नाही. ते पाच तारखेनंतरच चिखलदरामध्ये येतील. चिखलदरामध्ये काँग्रेसच्या तिकीटवर कोणी लढायला तयार नाही. काँग्रेसच्या उमेदवारांना सन्मानपूर्व आम्ही भाजपमध्ये घेऊ, असेही रवी राणा यांनी पुढे नमूद केले. 

हेही वाचा : Bharat Gogawale On Sunil Tatkare : ‘त्या’ आरोपावरुन गोगावलेंचं तटकरेंना ओपन चॅलेंज, प्रकरण काय?

दरम्यान, यशोमती ठाकूर यांच्याबाबत बोलताना रवी राणा म्हणाले की, चिखलदरामधील एकाही उमेदवाराला एक रुपयादेखील दिला नाही. कोणी कुणाच्या खुट्याला बांधायची ताकद नाही. भाजप मोठा पक्ष आहे. यशोमती ठाकूर बिहारमध्ये प्रभारी म्हणून गेल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांनी दिवा लावला नाही. ठाकूर मंत्री असताना आम्ही हनुमान चालीसा म्हटली म्हणून आम्हाला 14 दिवस जेलमध्ये टाकलं. आम्हाला जेलमध्ये टाकलं, तेव्हा त्यांना दादागिरी लक्षात आली नाही. हुकूमशाही लक्षात आली नाही. लोकशाही पद्धतीने काँग्रेसचे उमेदवार भाजपला सरेंडर होत आहे. चिंतन करण्याची वेळ हर्षवर्धन सपकाळ व यशोमती ठाकूर यांच्यावर आहे. आज चिखलदऱ्याचे उमेदवार भाजपसोबत आले आहे. येणाऱ्या सहा महिन्यात यशोमती ठाकूर भाजपमध्ये येतील, असा  दावा राणा यांनी यावेळी केला. तसेच निवडणुकीच्या आधी त्यांनी भाजपकडून तिवसा मतदारसंघाची तिकीट मागितली. अनेकवेळा त्या देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या. तिवसा मतदारसंघाचे भाजपचे तिकीट दिल्यास मी भाजपमध्ये येईन, असं त्या म्हणाल्या. राजेश वानखडे आमच्याकडे उमेदवार होते. म्हणून त्यांचा प्रवेश होऊ शकला नाही. काँग्रेसला जिल्ह्यात नगराध्यक्षदेखील उमेदवार मिळाला नाही, सगळे मुस्लिम उमेदवार दिले. काळ्या दगडावरली रेष आहे, यशोमती ठाकूर सहा महिन्यात भाजपात प्रवेश करतील, असे राणा ठामपणे म्हणाले. 

रवी राणा यांच्या वक्तव्यानंतर यशोमती ठाकूर यांचा पलटवार 

काळ्या दगळावरची पांढरी रेष आहे, आम्ही काँग्रेस सोडणार नाही, पण रवी राणा आणि नवनीत राणाला भाजप फेकून देईल, हे मात्र निश्चित आहे, असा पलटवार यशोमती ठाकूर यांनी रवी राणांवर केला. राणा यांना प्रत्युत्तर देताना, आमच्या भावाला जोक मारण्याची सवय आहे. अफवा, गोंधळ, नाटक, नोटंकी सगळ्या गोष्टी करण्याची सवय आहे. अमरावती जिल्ह्यातील भाजप रवी राणा आणि नवनीत राणांच्या खुट्याला बांधली आहे, असेही त्या म्हणाल्या.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number