Work From Home: राज्यात पावसाचा रेड अलर्ट; खासगी कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ बंधनकारक, मुख्यमंत्र्यांचा कडक आदेश

हवामान विभागाने 8 जुलैच्या रात्रीपर्यंत संपूर्ण राज्यात पावसाचा 'रेड अलर्ट' कायम ठेवल्याने परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे.

Work From Home: राज्यात पावसाचा रेड अलर्ट; खासगी कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ बंधनकारक, मुख्यमंत्र्यांचा कडक आदेश

Work From Home: महाराष्ट्रातील मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात एक उच्चस्तरीय बैठक घेतली. हवामान विभागाने 8 जुलैच्या रात्रीपर्यंत संपूर्ण राज्यात पावसाचा 'रेड अलर्ट' कायम ठेवल्याने परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व खासगी कंपन्या व व्यावसायिक संस्थांना कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तात्काळ 'वर्क फ्रॉम होम' (Work From Home) लागू करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. जे उद्योग या नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर कडक कायदेशीर पावले उचलली जातील, असा थेट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला असून, नागरिकांना केवळ अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर दरड कोसळली 
गेल्या 24 तासांत राज्याच्या विविध भागांत भूस्खलनाच्या घटना घडल्या असून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Expressway) मोठी दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. रस्त्यावरील माती आणि खडक हटवून कोंडी फोडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत. किनारपट्टीच्या भागात ताशी 50 ते 70 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून, समुद्रातील हायटाईडचा धोका पाहता NDRF आणि SDRF च्या तुकड्यांना संवेदनशील ठिकाणी 24 तास 'अलर्ट मोड'वर ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा – Maharashtra Monsoon Casualties: महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार! वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये राज्यात 9 नागरिकांचा मृत्यू

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटीचे संकट; पर्यटन स्थळांवर बंदी
अरबी समुद्रातील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या डोंगराळ भागात मंगळवारी तब्बल 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस कोसळण्याची म्हणजेच ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तेथील पर्यटन स्थळांवर तात्काळ बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. डोंगराळ आणि धोकादायक ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या असून, पर्यटकांनी या भागात जाणे पूर्णपणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number