Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार! कोकण, पुणे, नाशिकसह ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट; सुरक्षेसाठी अनेक ठिकाणी शाळा-कॉलेजेस बंद

पुढील 4 ते 5 दिवसांसाठी हवामान विभागाने कोकण किनारपट्टी आणि विविध जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरात अतिवृष्टीचा तीव्र इशारा दिला आहे.

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार! कोकण, पुणे, नाशिकसह ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट; सुरक्षेसाठी अनेक ठिकाणी शाळा-कॉलेजेस बंद

Maharashtra Rain Alert: संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनने रौद्र रूप धारण केले असून पुढील 4 ते 5 दिवसांसाठी हवामान विभागाने कोकण किनारपट्टी आणि विविध जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरात अतिवृष्टीचा तीव्र इशारा दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने रायगड, पालघर, पुणे आणि नाशिकच्या घाटमाथ्याचा समावेश असून या क्षेत्रांसाठी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. 

कोकणातील अन्य काही भागांमध्ये 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. यापूर्वीच मुंबई महानगर क्षेत्र (MMR) आणि ठाणे जिल्ह्यात ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वाहणारे वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, संपूर्ण राज्यातील आपत्कालीन यंत्रणांना 24 तास सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये उद्या शाळा-कॉलेज पूर्णपणे बंद; 

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी 7 जुलै रोजी तब्बल 200 मिलीमीटर ते 300 मिलीमीटर पेक्षा जास्त म्हणजेच ढगफुटीसदृश पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेत उद्या त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, दिंडोरी, सप्तशृंगी गड आणि नाशिक ग्रामीण भागातील सर्व शाळा व कॉलेजांना सुट्टी जाहीर केली आहे. 

त्र्यंबकेश्वर मंदिर आणि सप्तशृंगी देवी मंदिर बंद

दरम्यान, सुरक्षिततेचा उपाय म्हणून या परिसरातील आठवडी बाजारही बंद ठेवण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर, डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा धोका आणि पूरपरिस्थिती पाहता ऐतिहासिक त्र्यंबकेश्वर मंदिर आणि सप्तशृंगी देवी मंदिर भाविकांच्या सुरक्षेसाठी 1 दिवसासाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

पुणे, लोणावळा आणि ठाणे जिल्ह्यात पर्यटनावर कडक निर्बंध; 

दुसरीकडे, पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि मावळ भागात परिस्थिती गंभीर बनल्याने भुशी धरण, लायन्स पॉईंट व गड-किल्ल्यांच्या परिसरात 31 जुलैपर्यंत 'कलम 163' लागू करून धबधब्यांमध्ये उतरण्यास बंदी घालण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील धरणे आणि धबधबेही पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. 

हेही वाचा – Nashik Cloudburst Warning: नाशिकमध्ये ढगफुटीचं संकट; महापौरांचे नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन, दिल्या 'या' कडक सूचना

नागरिकांना 'वर्क फ्रॉम होम'चे आवाहन

तथापि, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर दरड कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून, मुंबईसह किनारपट्टीच्या भागात हायटाईडचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या सर्व गंभीर परिस्थितीचा विचार करून मुख्यमंत्री आणि स्थानिक प्रशासनाने नागरिकांना जिथे आहात तिथेच राहून अन्नधान्याचा साठा करण्याचे, तसेच सर्व खासगी कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना अनिवार्यपणे वर्क फ्रॉम होम (Work From Home) देण्याचे कडक निर्देश दिले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number