Tuesday, February 17, 2026 08:13:06 PM

रोखठोक आणि थेट...भल्याभल्यांना केवळ शब्दांनी घाम फोडणारी सिंहगर्जना!; शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची खणखणीत गाजलेली भाषणं

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 100 वी जयंती आहे.

रोखठोक आणि थेटभल्याभल्यांना केवळ शब्दांनी घाम फोडणारी सिंहगर्जना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची खणखणीत  गाजलेली भाषणं

"जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो" हे उद्गार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची एक अत्यंत गाजलेली आणि ओळखीची सुरुवात आहे. जी मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा हुंकार म्हणून ओळखली जाते.

या वाक्याचा अर्थ असा की, "जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो" म्हणजे "येथे जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो" असा होतो हे वाक्य भाषणाची सुरुवात करताना लोकांमध्ये एकोपा आणि आपली ओळख (हिंदू धर्म आणि मराठी अस्मिता) जागृत करण्यासाठी वापरले जाते. हे वाक्य केवळ एक संबोधन नसून, ते मराठी माणसाच्या स्वाभिमानाचे, हिंदुत्वाचे आणि अस्मितेचे प्रतीक बनले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांमध्ये या वाक्याने शिवसैनिकांच्या आणि मराठी जनतेच्या मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली, असे मानले जाते. 

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 100 वी जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा व्यंगचित्रकार, पत्रकार ते शिवसेना प्रमुखपर्यंतचा थक्क करणारा जीवन प्रवास नेहमीच लक्षात राहणारा आहे. मराठी माणसांच्या हितासाठी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. मराठी माणसांच्या अस्मितेसाठी बाळासाहेब ठाकरे लढले. बाळासाहेब व्यंगचित्रकार, पत्रकार म्हणून प्रसिद्ध होतेच. पण, ते उत्तम वक्ते म्हणून देखील लोकप्रिय होते. त्यांच्या भाषणाने सबंध शिवसैनिकांमध्ये नवी स्फूर्ती निर्माण व्हायची. बाळासाहेब ठाकरे यांचं "जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…", या वाक्यानं त्यांच्या भाषणाची सुरुवात व्हायची आणि शिवसैनिकांमध्ये नवं चैतन्य निर्माण व्हायचं.

बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1923 रोजी झाला. त्यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेना पक्षाची स्थापना केली. मुंबईमध्ये मराठी माणसांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली. पक्षाचा स्थापना केल्यापासून 2012 पर्यंत बाळासाहेबांनी पक्षाची कमान सांभाळली. या कालावधीत पक्षाचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला. महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरेंचं मोठं योगदान आहे.

शिवसेनेचा दबदबा राज्यात कायम आहे. लाखो शिवसैनिकांचा पाठींबा बाळासाहेबांना होता. पण हा आधार टिकवून ठेवणं हे काम त्यांनी नेहमीच केलं. तसंच ठाणे हे माझं आवडते शहर असल्याचा उल्लेख बाळासाहेबांनी त्यांच्या भाषणातून केला होता. या ठाण्याने शिवसेनेचा पहिला झेंडा फडकविला. तर पहिला नगराध्यक्षही ठाण्यातून निवडून आल्याचा अभिमान बाळासाहेबांनी त्यावेळी व्यक्त केला होता. त्यामुळे कोणतीही सभा घेण्यापूर्वी मी ठाण्यात येऊन नंतरच शिवतीर्थीवर जातो, असं छातीठोकपणे जमलेल्या तमाम शिवसैनिकांना संबोधून सांगितले. तर बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांची काही गाजलेली भाषणे आपण पाहूयात.

हेही वाचा : भाजपला 24 तासांत दुसरा धक्का, शिवसेनेकडे आला हुकूमी एक्का, नेमकं काय सुरू आहे राजकारणात?

बाळासाहेब ठाकरे यांची काही गाजलेली भाषणं -

बाळासाहेब ठाकरे यांचं ठाणे येथे झालेलं शेवटचं तडफदार भाषण ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने शिवसैनिकांनी उपस्थिती लावली होती. या भाषणादरम्यान बाळासाहेबांनी विरोधी पक्षनेत्यांवर जोरदार टीका केली होती.

31 मे 2000 मध्ये षणमुखानंद हॉलमध्ये बाळासाहेबांचं भाषण होतं. त्यावेळी त्यांच्यासोबत मच्छिंद्रनाथ, गोपीनाथ मुंडे यांचीसुद्धा उपस्थिती होती.

बाळासाहेबांची बहुतांश भाषणं ही शिवतीर्थावर म्हणजेच दादर येथील शिवाजी पार्कवर होत असे. 

छत्रपती शिवाजी महाराजांना स्फूर्तीस्थान मानून शिवसेनेने नेहमीच त्यांचं कार्य केलं आहे. विधानसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर त्याचा शपथविधी सोहळा हा शिवतीर्थावरच होणार, असं वचन बाळासाहेबांनी शिवसैनिकांना दिलं होतं.

दरवर्षी दसऱ्याला शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर होत असे. यावेळी बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांना काय संबोधित करणार, याकडे सर्वांचेच लक्ष असायचे. 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या