Friday, February 13, 2026 01:42:07 AM

Cyber Crime In Pune : आजवरचा सर्वात मोठा Cyber Fraud! ज्येष्ठ नागरिकाला तब्बल 22 कोटींचा ऑनलाईन गंडा; पोलिसांनी सांगितली डोकं चक्कावणारी माहिती

सायबर चोरट्यांनी एका 88 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची 22 कोटी 3 लाख 22 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

cyber crime in pune  आजवरचा सर्वात मोठा cyber fraud ज्येष्ठ नागरिकाला तब्बल 22 कोटींचा ऑनलाईन गंडा पोलिसांनी सांगितली डोकं चक्कावणारी माहिती

पुणे : ऑनलाइन शेअर बाजारात गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका 88 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची 22 कोटी 3 लाख 22 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही आजवरची सर्वांत मोठी सायबर फसवणूक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस तपास करत आहेत. 

हेही वाचा : Pune ZP Election 2026 : राजकारण तापलं! दत्तात्रय भरणेंचा मुलगा अन् हर्षवर्धन पाटलांची लेक; एकाच चिन्हावर लढणार निवडणूक

तक्रारदार हे मूळचे गुरुग्राम (हरियाणा) येथील असून सध्या मगरपट्टा सिटी परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांचा हडपसर औद्योगिक वसाहतीत छोटा कारखाना होता. कोरोना काळात आर्थिक अडचणींमुळे त्यांनी कारखाना विकला. या व्यवहारातून मिळालेली मोठी रक्कम आणि इतर मालमत्ता विक्रीतून मिळालेले पैसे त्यांनी साठवून ठेवले होते. 26 मोबाईलचा वापर करत अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत तक्रारदारांनी सात बँकांमधील 150 वेगवेगळ्या खात्यांत पैसे पाठवले. ही खाती मुख्यतः नोएडा, कोलकाता, बंगळुरू आदी शहरांतील 'म्यूल अकाउंट्स' (भाड्याने वापरली जाणारी खाती) असल्याचे आढळले आहे. फसवणुकीसाठी चोरट्यांनी 26 मोबाईल क्रमांक, एक इंटरनेट-आधारित फोन नंबर, तीन वेब लिंक आणि बनावट 'शेअर ट्रेडिंग अ‍ॅप' वापरल्याचे पोलिसांनी सांगितले. 

तक्रारदारांनी सहज बोलताना मुलाला ऑनलाइन 'शेअर ट्रेडिंग'मध्ये गुंतवणूक करत असल्याचे सांगितले. यानंतर मुलाला संशय आला. त्यानंतर कुटुंबियांनी पुणे सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी अधिक तपास सायबर पोलीस करत आहेत.


सम्बन्धित सामग्री