Friday, March 13, 2026 08:06:04 AM

Rohit Pawar : "पुढील 48 तासात सर्वकाही उघड करणार" दादांच्या विमान अपघातानंतर रोहित पवारांची आक्रमक भूमिका

रोहित पवार, अमोल मिटकरी आणि आमदार संदीप क्षीरसागर मरीनड्राईव्ह पोलिस ठाण्यात DGCA विरोधात FIR दाखल करण्यासाठी दाखल झाले असून रोहित पवार आक्रमक पोलिसांनी शाब्दिक वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

rohit pawar  quotपुढील 48 तासात सर्वकाही उघड करणारquot दादांच्या विमान अपघातानंतर रोहित पवारांची आक्रमक भूमिका

आमदार रोहित पवार, आमदार अमोल मिटकरी आणि आमदार संदीप क्षीरसागर मरीनड्राईव्ह पोलिस ठाण्यात DGCA विरोधात FIR दाखल करण्यासाठी दाखल झाले असून रोहित पवार आक्रमक पोलिसांनी शाब्दिक वाद झाल्याचे पाहायला मिळाले. अजित दादांचा अपघात झाला त्या व्हीएसआर कंपनी आणि त्यांच्याशी संबंधित लोकं आणि DGCA यांच्यावर गुन्हा दाखल करावा ही मागणी तिन्ही आमदार करत आहेत. त्या संदर्भात लेखी तक्रार ही रोहित पवार यांच्याकडून देण्यात येईल.

हेही वाचा- Baramati Bypoll Elections: बारामतीचा वारसदार ठरला! अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा वहिनी विधानसभेच्या रिंगणात, तर पार्थ पवारांना नवी जबाबदारी

यावेळी पोलिस ठाण्यात आमदार रोहित पवार अमोल मिटकरी आक्रमक देखील झाल्याचे पाहायला मिळाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झाले असताना, पुरावे असताना पोलिस का कारवाई करत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच अजितदादांच्या विमान अपघातानंतर डीजीसीएने तातडीने आपल्या अहवालात व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीला क्लिनचीट देण्याचा प्रयत्न झाला असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. त्याचसोबत पुढील 48 तासात विमान अपघात प्रकरणात आणखी मोठी माहिती उघड करणार असल्याचेही रोहित पवार यांनी सांगितले.

हेही वाचा- Ajit Pawar Plane Crash Update: दादांच्या निधनानंतर मोठा निर्णय! संबंधित विमान कंपनीवर सरकारची थेट कारवाई; आदेश देत म्हटलं की...

यावेळी अजित पवार यांच्या विमान अपघाताला घेऊन रोहित पवार मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. यानंतर आता मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून आमदार रोहित पवारांना (पोहोच पावती ) पत्र देण्यात आलं आहे. पोलिसांनी रोहित पवार यांना दिलेल्या पत्रात म्हंटल आहे की “ तुम्ही सादर केलेली तक्रार स्वीकारली असून आपण दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तपासणी करून पुढील कारवाई करण्यात येईल. आता या प्रकरणात मुंबई पोलीस FIR कधी आणि कोणत्या कलमा अंतर्गत घेणार याकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. 


सम्बन्धित सामग्री