Rupali Chakankar : रूपाली चाकणकर यांनी घेतली पोलीस महासंचालकांची भेट; पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार

अशोक खरात आणि रूपाली चाकणकरांचे अनेक फोटो व्हायरल झाले असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत.

Rupali Chakankar : रूपाली चाकणकर यांनी घेतली पोलीस महासंचालकांची भेट; पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार

नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि गुरू कॅप्टन अशोक खरात या भोंदू बाबाला महिलांचे शोषण करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून यामुळे राजकारणही चांगलेच तापले आहे. या प्रकरणानंतर अशोक खरात आणि रूपाली चाकणकरांचे अनेक फोटो व्हायरल झाले असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. कॅप्टन अशोक खरातने केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाची झळ थेट रुपाली चाकणकर यांच्यापर्यंत पोहोचली आहे. या प्रकणावर अनेक सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. तसेच राज्यभरात रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. 

हेही वाचा- Rupali Chakankar : मोठी बातमी ! खरात प्रकरण रुपाली चाकणकरांना भोवले; मुख्यमंत्र्यांकडून तात्काळ राजीनाम्याचे आदेश

यानंतर आता महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी घेतली पोलीस महासंचालकांची भेट घेतली आहे. ही भेट मुंबईमध्ये घेतली असल्याची माहिती आहे. दरम्यान रूपाली चाकणकर यांनी या सगळ्या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी करण्याची मागणी केली असल्याचे समोर आले आहे. तसेच मी माझी भूमिका लवकर पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करेन असे देखील रूपाली चाकणकर यांनी सांगितले आहे. या सर्व प्रकरणादरम्यान रूपाली चाकणकर यांनी सुनेत्रा पवार यांची अद्याप भेट घेणार नसल्याचे सांगितले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number