Thursday, February 12, 2026 02:28:49 PM

Rupali Patil Thombre Pune : आयोगावर ताशेरे, पोलिसांना विनंती; गुन्हा दाखल झाल्यानंतर रुपाली ठोंबरे Exclusive

रुपाली ठोंबरे यांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया देत आपण असल्या तक्रारींना घाबरत नाही, असे म्हटले आहे.

rupali patil thombre pune  आयोगावर ताशेरे पोलिसांना विनंती गुन्हा दाखल झाल्यानंतर रुपाली ठोंबरे exclusive

पुणे : महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान मतदान केंद्रात गोंधळ घालणे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांना भोवलं आहे. मतमोजणीवेळी निवडणूक प्रक्रिया व शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रूपाली ठोंबरे यांच्यासह त्यांच्या समर्थकांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र रुपाली ठोंबरे यांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया देत आपण असल्या तक्रारींना घाबरत नाही असे म्हटले आहे. त्यांनी गुन्हा दाखल होताच एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये त्यांनी निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले असून पोलिसांना मात्र योग्य कारवाई करण्याची विनंती केली आहे.

हेही वाचा : Palash Muchhal Controversy: ‘दुसऱ्या महिलेसोबत बेडवर रंगेहात पकडलं…’ गंभीर आरोपांवर पलाशने अखेर मौन सोडलं, म्हणाला ‘मी चुकीचं…’ 

काय आहे प्रकरण 

राज्यात 29 महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया 15 जानेवारी रोजी पार पडली. तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया झाली. त्या दिवशी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील टिळक रस्त्यावरील डीईएस न्यू इंग्लिश स्कूल येथे मजमोजणी सुरू असताना हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मतमोजणी सुरू असताना रुपाली ठोंबरे यांनी त्यांच्या हरकत अर्जाची पोहोच द्यावी, अशी मागणी करून मतदान मोजणी केंद्रात उभारलेल्या सुरक्षा जाळीवर चढून आरडाओरड केली.


सम्बन्धित सामग्री