Friday, February 13, 2026 06:31:47 PM

Samadhan Sarvankar VS BJP : 'भाजपाच्या टोळीमुळेच माझा पराभव' समाधान सरवणकरांचा भाजपवर गंभीर आरोप

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सदा सरवणकर यांचे चिरंजीव समाधान सरवणकरांना पराभवाला समोरे जावे लागले, यावेळी त्यांनी त्यांच्या पराभवाचे खापर भाजपवर फोडल आहे.

samadhan sarvankar vs bjp  भाजपाच्या टोळीमुळेच माझा पराभव समाधान सरवणकरांचा भाजपवर गंभीर आरोप

शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांचे चिरंजीव समाधान सरवणकर हे नुकतीच पार पडलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत समाधान सरवणकर आणि मुलगी प्रिया सरवणकर यांचा ठाकरे गटाच्या निशिकांत शिंदे यांनी पराभव केला. यापुर्वी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या महेश सावंत यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील त्यांना पराभवाला समोरे जावे लागले, यावर बोलताना समाधान सरवणकर यांनी त्यांच्या पराभवाचे खापर भाजपवर फोडल आहे. भाजपमुळेच माझा पराभव झाला, भाजपमधील एक टोळी पैशांसाठीच काम करते आणि पैशांसाठीच भाजपनं माझा पराभव केला. असं म्हणत समाधान सरवणकर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 

हेही वाचा- BMC Mayor: मुंबईचा महापौर भाजपचाच; भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडून गौप्यस्फोट, या तारखेला ...

यावेळी समाधान सरवणकर म्हणाले की, "मी माझ्या मतदारांचे सर्वात आधी आभार मानत आहे. माझ्याकडे मराठी मतदार वस्ती जास्त असून देखील, आज दोन भाऊ किंवा दोन कुटुंब एकत्र येऊन देखील फक्त 500 मतांनी आज पराजय झालेला आहे. ठिक आहे काही वेळेस भावनिक गोष्टी होतात. तरी देखील कामाची जाण ठेऊन 15 हजारहून अधिक मतदार आज माझ्या पाठीशी खंभीरपणे उभे राहिले आहेत आणि मला यावेळेस त्यांनी मतदान केलं आहे". 

हेही वाचा- Mumbai Investment: मुंबईत रोजगाराच्या नव्या संधी! एक लाख कोटींची गुंतवणूक आणि दीड लाख नोकऱ्या, गुंतवणुकीचा सामंजस्य करार

तसेच पुढे समाधान सरवणकर म्हणाले की, "सरवणकर साहेबांच काम माहिम विधानसभेत प्रत्येक वस्तीमध्ये आहे. प्रत्येक नागरिक त्यांना ओळखतो की, ते काम करणारे व्यक्ती आहेत. आज देखील जरी आमदार समोरच्या पक्षातील आला असेल तरी, लोकांची जी समस्या असते ती लोक सरवणकर साहेबांकडे घेऊन येतात, हे समोरच्यांच दु:ख आहे. ही जी टोळी आहे ती कोणालाही मानत नाही, आज त्यांच्या मुंबई अध्यक्षांना मानत नाही. आशिष शेलारांना मानत नाही त्यांचा उल्लेख एकेरी भाषेत केला जातो, एवढ्या घमेंडीमध्ये ते सगळे आहेत. फक्त एवढच की त्यांच्याकडे त्या पक्षाच पद आहे. मराठी माणूस हा आता विकासाला प्राधान्य देतो. कुटुंबापेक्षा जो विकास करेल किंवा काम करेल त्याला प्राधान्य देतो. मराठी अमराठी मुद्दा हा तुम्ही अजून किती वर्ष चालवणार? मराठी माणूस सुद्धा आता हुशार झालेला आहे आणि सुशिक्षित झालेला आहे. त्यांनी सुद्धा माहित आहे की, यांच्या या राजकारणाला किती दिवस बळी पडतोय ते त्याच्यामुळे त्यांना देखील माहित आहे की, जो विकास करेल त्यालाच प्राधान्य दिलं पाहिजे. मला असं वाटत आहे की, मुंबईमध्ये महायुतीचा महापौर आता बसतो आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात खुप चांगल्या प्रकारे विकास होईल". 

 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या