Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ! तक्रार देण्यास गेलेल्या महिलेच्या पतीला पोलिसाकडून मारहाण

एका 22 वर्षीय विवाहितेवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी तक्रार देण्यासाठी गेलेल्या पीडितेच्या पतीला सहायक उपनिरीक्षकाने कानशिलात मारल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ! तक्रार देण्यास गेलेल्या महिलेच्या पतीला पोलिसाकडून मारहाण

एका 22 वर्षीय विवाहितेवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी तक्रार देण्यासाठी गेलेल्या पीडितेच्या पतीला सहायक उपनिरीक्षकाने कानशिलात मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीनंतर पीडितेचा पती ठाण्यातच बेशुद्ध पडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शनिवारी पीडिता आणि तिचे पती पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार देण्यास गेले. तेथे राठोड नामक कर्मचाऱ्याला पीडिता आपबिती सांगत असताना पोलिस आणि पीडितेच्या पतीमध्ये शाब्दिक चकमक उडाली. आरोपानुसार, हिंगे नामक पोलिस कर्मचाऱ्याने पीडितेच्या पतीच्या कानशिलात लगावली. जोराचा फटका बसल्याने तो जमिनीवर कोसळला. त्यानंतर पोलिसांच्या वाहनातूनच त्याला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तर पोलोसांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे, तर पीडिताने पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासणीची मागणी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number