Sanjay Raut : "अजित पवारांचे पुरावे गाडीने फिरवण्याचे नाटक कोणी केले?" संजय राऊतांचा रोख नेमका कोणाकडे?

खासदार संजय राऊत यांनी पेपरफुटीवरून तसेच गुजरातमध्ये पार पडणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यावरून मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीकांचा हल्ला चढवला आहे. 

Sanjay Raut : &quotअजित पवारांचे पुरावे गाडीने फिरवण्याचे नाटक कोणी केले?&quot संजय राऊतांचा रोख नेमका कोणाकडे?

पेपरफुटीच्या प्रकरणावरून हजारो विद्यार्थ्यांनी पुण्यात धडक मोर्चा काढला. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय निघालेल्या या मोर्चात, विद्यार्थ्यांनी पेपर फुटीवरून MPSC चे अध्यक्ष अन् सचिवांना थेट टार्गेट करत राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) भोंगळ कारभाराविरोधात आणि पेपरफुटीच्या निषेधार्थ राज्यातील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. अशातच खासदार संजय राऊत यांनी पेपरफुटीवरून तसेच गुजरातमध्ये पार पडणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यावरून मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीकांचा हल्ला चढवला आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की,  "मुळात लोकसेवा आयोगाची जी रचना आहे. ती अत्यंत राजकीय स्वरूपाची आहे. कोणते निकष लावून माणसे नेमली जातात याची आचारसंहिता आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त असणारे बापट सुद्धा चेयरमन होते. लोकसेवा आयोगाचे आज अधपतन झाले आहे. कोणतेही विद्यापीठ देशातल्या शैक्षणिक संस्था यावर नेमलेली माणसे ही एका राजकोय विचाराची आहेत पण त्यांची कुवत तिथे बसण्याची नाही. लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत मला माहीत नाही. पहिले माहिती असायचे पण आता माहीत नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःला काही बाबतीत तरी निष्पक्ष होत राजकीय माणसे ते घुसवण्याचे काम बंद करतील तेवा विद्यार्थ्याना न्याय मिळेल. यशवंतराव यांनी केलेला आयोग धुळीस मिळाला आहे. चर्चा कोण करत आहे त्यांच्याशी, त्यांच्याकडे एकच औषध आहे ते म्हणजे चंपतराय."

हेही वाचा- Manoj Jarange: इकडे जरांगेंची प्रकृती बिघडली अन् तिकडे सरकारच्या हालचालींना वेग; रात्री अडीच वाजता फोन अन्…; मोठी अपडेट समोर

"या विद्यार्थ्याना ते दिमागी नक्सल पुन्हा म्हणतात. पंतप्रधान चेष्टा करतात या मुलाची. रस्त्यावर उतरलेल्या मुलाना मोदीनी दिमागी नक्षल म्हटले आहे कस काय होणार या देशाचे? विरोधी पक्षाचे काम काय आहे. अजित पवार यांच्याबाबत गाडीने पुरावे घेऊन फिरण्याचे नाटक कोणी केले. या पक्षातील काही नेते हे विरोधक होते तेव्हा ते रस्त्यावर उतरत होते. कोरोना काळाचे राजकारण देवेंद्र फडणवीसयांनी केले होते. त्यामुळे राजकीय हत्यार म्हणून वापरू नये." 

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा नॅशनल फिल्म अवॉर्ड प्रथमच राजधानी दिल्ली बाहेर होणार आहे. गुजरातमध्ये हा सोहळा रंगणार आहे. त्यावरुन खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "मुंबई मधल्या कंपन्या गुजरातला नेता, आता इकडे गोळा करणार आणि गुजरातला नेणार. फिल्म फेस्टिवल ७२ वर्ष दिल्लीत होत होता तो देखील गुजरातला नेत आहेत. मोदी गुजरातचे पंतप्रधान आहेत का? गुजरातला का नेत आहात. ज्याला स्वाभिमान असेल त्यांनी अशा गुजरातला अशा कार्यक्रमावर बहिष्कार टाकला पाहिजे. मी म्हणत नाही महाराष्ट्र किंवा कुठे व्हावा तो देशाच्या राजधानीत झाला पाहिजे. बाकी सगळे राज्य गुलाम आहेत अशा मानसिकतेतून हे मोदी करत आहेत. कलाकारांमध्ये स्वाभिमान असेल तर ते नाही जाणार. गुजरातला निवडणूक असल्यामुळे तिथे करायचे असेल तर चुकीचे आहे. हे स्वतःला गुजरातचे पंतप्रधान म्हणून काम करत आहेत."
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number