भारताच्या एअर स्ट्राईक हल्ल्यावर संजय राऊत चिडिचूप; राहुल गांधींना सुद्धा करावं लागलं हवाई हल्ल्याचं कौतुक

पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी बुधवारी पहाटे भारतीय लष्कराच्या हवाई दलाने पाकिस्तानातील पीओके आणि दहशतवादी तळ उध्वस्त करून दहशतवाद्यांचा खात्मा केला.

भारताच्या एअर स्ट्राईक हल्ल्यावर संजय राऊत चिडिचूप; राहुल गांधींना सुद्धा करावं लागलं हवाई हल्ल्याचं कौतुक

नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी बुधवारी पहाटे भारतीय लष्कराच्या हवाई दलाने (Indian Air Force) पाकिस्तानातील पीओके आणि दहशतवादी तळ उध्वस्त करून दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि त्यासोबतच भारताने नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक करून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः भारतीय सशस्त्र दलांच्या कारवायांवर लक्ष ठेवून होते.

हेही वाचा: पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कोणती अचूक शस्त्रे वापरली? जाणून घ्या

भारताने केलेल्या या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव दिले आहे. सध्या, भारताच्या कारवाईवर जगभरासह देशातील अनेक राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया समोर येत आहे. काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ वर प्रतिक्रिया देत म्हटले की, ‘आपल्या लष्कर सेनेचा मला अभिमान आहे. जय हिंद’.

यासह, ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत, ‘भारतीय सेनेचे अभिनंदन! आता थांबायचे नाही.चून चून के मारो! सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे. शिवसेना या बैठकीत उपस्थित राहील! जय हिंद!‘ म्हटले.

शरद पवारांनी केले हवाई दलाचे कौतुक:

राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट) प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एक्सवर प्रतिक्रिया देत भारतीय सेनेचे कौतुक करत म्हटले की, ‘आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे. आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. या कारवाईत पाकिस्तानी नागरिक किंवा पाक लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता, अतिरेक्यांच्या नऊ लक्ष्यांवर अचूक आणि नियोजित हल्ला करण्यात आला. भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. भारताचे सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखणाऱ्या तसेच पहलगाम हल्ल्याचा योग्य प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचे मनःपूर्वक अभिनंदन.’

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number