ठाकरेंचे सहा खासदार फुटल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली असून ठाकरे गटाला मोठं खिंडार पडले आहे. अशातच आज दोन्ही शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन आहे. त्यापूर्वीच ठाकरेंचे सहा खासदार फुटून त्यांनी वेगळा गट निर्माण केला. त्यानंतर हे सहा खासदार आज शिवसेनेच्या वर्धापन दिनी शिनसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरून ठेवला आहे. अशातच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सहा बंजखोर खासदार तसेच एकनाथ शिंदे आणि गटावर सडकून टीका तर केलीच पण बंडखोर खासदारांबद्दल मोठा खुलासा केला आहे.
“मी शिवसेना फुटली असं म्हणत नाही… माणूस फुटतो वैचारिक वारसा घेऊन. जर तु स्वतःला बाजारात उभं केलं आहे आणि तुला कोणी विकत घेतलं तर त्याला फुटत म्हणत नाही. तसे आमचे 6 खासदार विकले गेले. एकाला तरी विचारा त्यांना शिवसेनेचा काय विचार माहित आहे… जळगावच्या मावशीबाई काल बोलत होत्या… काँग्रेसच्या मांडीवर बसलो म्हणून हे गेले. महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षत आहे… त्यांच्या मदतीने हे सहा लोकं निवडून आले… तेव्हा माहित न्हवतं का काँग्रेस सोबत होती. काँग्रेसचा या मावशीबाईला तिटकारा कशाला… काँग्रेसमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले… तुम्ही काय केलं… त्यांची लोकं तुरुंगात गेले… तुमच्यात कोणी आहे का असं. भगत सिंग यांनी बंड केला.. राजगुरू यांनी क्रांती केली त्यांनी खोके घेतले का? भाजच्या लोकांनी बंड किंवा क्रांती केलेली नाही.”
“जेव्हा पक्षाचा आदेश येतो.. ज्याने तुम्हाला आमदार केलं खासदार केलं तेव्हा पक्ष संकटात असताना किमान 4 तास काढावे लागतात. कोर्ट घरात भरत नाही, कोर्ट पुण्यात भरत नाही ना… आम्हाला गोष्टी कळतात. संजय दीना पाटील यांना जायचं कारण नव्हतं… निष्ठावंत महिलेला डावलून आम्ही त्यांच्या मुलीला तिकीट दिलं… संजय दीना पाटील यांची आम्ही काल वाट बघत होतो. ते आले नाही. ज्यावेळेस पक्ष संकटातून जात होता त्यावेळेस ते आले नाही मगं आता कशाला कोणी अक्कलेचे तारे तोडावे. मोदी आणि ट्रम्पची भेट झाली…मोदीने ट्रम्पला सांगितलं की शिंदे इथे येतोय तुमचे 40 खासदार फोडायला. असं कोण म्हणालं की, 50-60 आमदार नगरसेवक फोडणार? ज्यांना स्वतःला विकयचं आहे ते कुठेही जाणार… नंबर गेम साठी आम्ही पक्षाचा बळी द्यायचा का… अमित शाह काय संजीवनी बुटीका खाऊन जन्माला आलेले नाही. कोणी अमर आहे का?”