Thursday, November 13, 2025 08:37:45 AM

Saptashrungi Devi: सप्तशृंगी देवीचे मंदिर दर्शनासाठी तब्बल 19 तास खुले असणार, दिवाळीसाठी मंदिर प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण निर्णय

सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दिवाळीनिमित्त भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने विशेष निर्णय घेतला आहे.

saptashrungi devi सप्तशृंगी देवीचे मंदिर दर्शनासाठी तब्बल 19 तास खुले असणार दिवाळीसाठी मंदिर प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण निर्णय

नाशिक: सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दिवाळीनिमित्त भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने विशेष निर्णय घेतला आहे. यामुळे भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहे. 

भाविकांना किती वाजेपर्यंत दर्शन घेता येणार 
सप्तश्रृंगी देवीचे मंदिर 22 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरपर्यंत रोज सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे. या काळात भाविक सकाळपासून संध्याकाळपर्यंत देवीचे दर्शन घेऊ शकणार आहेत. या निर्णयामुळे गर्दी नियंत्रणात येईल आणि भाविकांना सोयीस्कर सुविधा मिळेल. 

हेही वाचा: Flood Relief Fund: केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी एवढ्या कोटींची आगाऊ रक्कम मंजूर

गडावर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी रोप वे ट्रॉलीची सुविधा देखील उपलब्ध राहणार आहे. ही सुविधा सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 11.30 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे गडावर जाणे आणि दर्शन घेणे अधिक सोपे आणि सुरक्षित होणार आहे.

दिवाळीच्या सणात भक्तांसाठी मंदिर प्रशासनाने अनेक सोयी आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे भक्तांना दर्शनासाठी मोठी गर्दी, उशीर किंवा गैरसोय भासणार नाही. भक्तांनी मंदिराच्या वेळापत्रकानुसार दर्शनासाठी यावे अशी शिफारस देखील प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ मानल्या जाणाऱ्या सप्तशृंगी गडावरील मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांना मंदिर प्रशासनाकडून सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मंदिरात साफसफाई, दर्शनासाठी योग्य रस्ता आणि रोप वेची सुविधा सतत उपलब्ध राहणार आहेय त्यामुळे भाविकांना आरामात दर्शन घेता येणार आहे. 

   


सम्बन्धित सामग्री