Sangli Satish Patil Death : ओव्हरटेकचा प्रयत्न जीवावर बेतला! सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमनच्या स्वीय सहाय्यकाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन मानसिंगराव नाईक यांचे स्वीय सहायक सतीश पाटील यांचा एका अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.

Sangli Satish Patil Death : ओव्हरटेकचा प्रयत्न जीवावर बेतला! सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमनच्या स्वीय सहाय्यकाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन मानसिंगराव नाईक यांचे स्वीय सहायक सतीश पाटील यांचा एका अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. सांगलीतील कुपवाड-कवलापूर रस्त्यावर झील इंटरनॅशनल स्कूलसमोर गुरुवारी दुचाकी आणि ट्रॅक्टरचा अपघात होऊन दुचाकीस्वार सतीश रामचंद्र पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा- Pune Crime : धक्कादायक! श्रावणात मांसाहार मागितल्याने बापानेच पोटच्या लेकराला मरेपर्यंत मारलं; वडिलांसह पुरावे नष्ट करणाऱ्या आईलाही अटक

ट्रॅक्टर कवलापूरच्या दिशेने जात होता. त्याचवेळी सतीश पाटील हे दुचाकीवरून जात असताना समोरून वाहन आल्याने ते गडबडले. यावेळी त्यांच्या दुचाकीची ट्रॅक्टरला धडक बसली. धडकेनंतर ते रस्त्यावर जोरात आपटल्याने गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

अपघाताची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला असून, अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे. मृत सतीश पाटील हे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन मानसिंगराव नाईक यांचे स्वीय सहाय्यक होते. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number