जनधन खात्यांमुळे महागाईत मोठी घट झाली; स्टेट बँकेचा अहवाल

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   गरीब आणि वंचितांना बँकिंग व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी केंद्र सरकारने राबवलेल्या पंतप्रधान जनधन योजनेचे सकारात्मक परिणाम दिसण्यास सुरुवात झालीय. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात उघडण्यात आलेल्या जनधन खात्यांमुळे तेथील महागाईत मोठी घट झालीय. याशिवाय अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आल्यामुळे ग्रामीण जनतेच्या वागणुकीत बदल झालाय. स्टेट बँकेच्या एका अहवालात ही बाब समोर आलीय. […]

जनधन खात्यांमुळे महागाईत मोठी घट झाली; स्टेट बँकेचा अहवाल

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

गरीब आणि वंचितांना बँकिंग व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी केंद्र सरकारने राबवलेल्या पंतप्रधान जनधन योजनेचे सकारात्मक परिणाम दिसण्यास सुरुवात झालीय. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात उघडण्यात आलेल्या जनधन खात्यांमुळे तेथील महागाईत मोठी घट झालीय. याशिवाय अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आल्यामुळे ग्रामीण जनतेच्या वागणुकीत बदल झालाय. स्टेट बँकेच्या एका अहवालात ही बाब समोर आलीय.

स्टेट बँकेने नुकताच ‘टँजिबल बेनिफिट ऑफ फायनान्शियल इन्क्लूजन’ हा अहवाल सादर केलाय. त्यामध्ये नमूद माहितीनुसार आतापर्यंत जनधन योजनेंतर्गत देशात 30 कोटींहून अधिक जनधन खाती उघडली गेली आहेत.  त्यातील साठ टक्के खाती एकट्या ग्रामीण भागातील आहेत. राज्यांच्या आधारावर जनधन खाते आणि घाऊक महागाईचे विश्लेषण करण्यात आलंय. त्यानुसार ज्या राज्यांमध्ये जास्त खाती उघडण्यात आली आहेत, तेथे महागाईचे प्रमाण घटल्याचे समोर आलंय.

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number