Thursday, July 17, 2025 02:51:54 AM

आमदार अब्दुल सत्तारांवर गंभीर आरोप

आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर गंभीर आरोप केलेले पाहायला मिळत आहे. अब्दुल सत्तारांनी शेतजमिनी हडप केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.

आमदार अब्दुल सत्तारांवर गंभीर आरोप

छत्रपती संभाजीनगर: आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर गंभीर आरोप केलेले पाहायला मिळत आहे. अब्दुल सत्तारांनी शेतजमिनी हडप केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. सामाजिक कार्यकर्ते शंकर पल्ली यांनी हा आरोप केला असल्याची माहिती आहे. खासदार इम्तियाज जलील यांच्याशी पल्ली यांनी संवाद साधला आहे. 

आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडमध्ये अनेक जणांच्या शेतजमिनी प्लॉटिंग भूखंड हडप केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते शंकर पल्ली यांनी केला होता. यानंतर आज माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या भेटीसाठी ते छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाले झाले, होते परंतु इम्तियाज जलील हे बाहेरगावी असल्याने त्यांनी दुरध्वनीवरून संपर्क साधला आहे.

हेही वाचा: शेतीच्या वादातून बाईने ट्रॅक्टर चालकाला धू धू धुतले

काय म्हणाले सामाजिक कार्यकर्ते शंकर पल्ली?
कुणीतरी महाराष्ट्रामध्ये सरकारच्या विरोधात बोलतोय. एखाद्या मंत्र्याचा भ्रष्टाचार बाहेर काढतोय, जो भ्रष्टाचार काढतो त्याच्याकडेच माणूस जाईल असे सामाजिक कार्यकर्ते शंकर पल्ली यांनी म्हटले आहे. तसेच आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडमध्ये अनेक जणांच्या शेतजमिनी प्लॉटिंग भूखंड हडप केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते शंकर पल्ली यांनी केला होता. यानंतर आज माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या भेटीसाठी ते छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाले होते परंतु इम्तियाज जलील हे बाहेरगावी असल्याने त्यांनी दुरध्वनीवरून संपर्क साधला. अब्दुल सत्तार यांनी सर्व लोकांना त्रास दिलेला आहे. बळजबरी अनेक जणांच्या संपत्ती त्यांनी हडपल्या आहेत. मेडिकल कॉलेजची संपत्ती त्यांनी बळकविली असल्याचे पल्ली यांनी सांगितले आहे. 


सम्बन्धित सामग्री