Wednesday, June 18, 2025 02:44:22 PM

चिमुकलीवर वयोवृद्ध नराधमाचा लैंगिक अत्याचार

घराशेजारी राहणाऱ्या 9 वर्षाच्या चिमुकलीवर वयोवृद्ध नराधमाने  लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना लातूरच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ (जवळगा) येथे घडली.

चिमुकलीवर वयोवृद्ध नराधमाचा लैंगिक अत्याचार

अजय घोडके, प्रतिनिधी, लातूर : घराशेजारी राहणाऱ्या 9 वर्षाच्या चिमुकलीवर वयोवृद्ध नराधमाने  लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना लातूरच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ (जवळगा) येथे घडली. विलास श्रीरंग कांबळे (वय 55) असे वयोवृद्ध नराधमाचे नाव असून शिरूर अनंतपाळ पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

साकोळ येथील नऊ वर्षीय  चिमुकली घराच्या अंगणात झोका खेळत होती. विलास कांबळे या वयोवृद्ध नराधमाने तिला जवळ बोलावून तिचे कपडे काढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी चिमुकलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 2012 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम आरोपी विलास कांबळेला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनसापुरे करत आहेत.

हेही वाचा : नवी मुंबईतील महिलेच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पतीनेच दिली होती सुपारी

नेमकं घडलं काय?
लातूर जिल्ह्यातील अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथे धक्कादायक घटना घडली. विलास कांबळे या नराधमाने त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या 9 वर्षीय मुलीवर लैगिंक अत्याचार केला आहे. अल्पवयीन मुलगी अंगनात झोका खेळत होती. झोका खेळत असताना विलासने त्या मुलीला बोलावले. मुलीला जवळ बोलावून तिचे कपडे काढले आणि तिच्यावर अत्याचार केला. चिमुरडीवर झालेल्या अत्याचारानंतर तिच्या आईने पोलिसात धाव घेतली आणि नराधमाविरूद्ध गुन्हा दाखल केला. अनंतपाळ पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 2012 अन्वये आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपी विलास कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अनसापुरे करत आहेत. 


सम्बन्धित सामग्री