Wednesday, July 09, 2025 10:16:41 PM

Shani Vakri 2025: सावधान! शनीच्या वक्री चालीमुळे 'या' तीन राशींना होणार प्रचंड त्रास; जाणून घ्या उपाय

13 जुलैपासून शनि वक्री होत असून मेष, मिथुन व वृश्चिक राशींवर त्याचा नकारात्मक प्रभाव दिसणार आहे. आर्थिक नुकसान, तणाव आणि निर्णयांमध्ये चूक होण्याची शक्यता.

shani vakri 2025 सावधान शनीच्या वक्री चालीमुळे या तीन राशींना होणार प्रचंड त्रास जाणून घ्या उपाय

शनि वक्री 2025: श्रावण महिना म्हणजेच सावन हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. यंदाचा सावन 13 जुलै 2025 पासून सुरू होत असून, 9 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या महिन्यात शिव पूजनाला विशेष महत्त्व दिले जाते. मात्र यंदाचा सावन ज्या काही राशींसाठी शुभ संधी घेऊन येतोय, तसाच काही राशींना धोका देणारा ठरतोय  कारण 13 जुलैपासून शनिदेव वक्री होणार आहेत.

शनि वक्री स्थितीत म्हणजेच उलट चाल करत असताना काही राशींवर गंभीर परिणाम करू शकतात. यंदा शनि 13 जुलैपासून 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत वक्री राहणार आहेत. या काळात मेष, मिथुन आणि वृश्चिक राशींसाठी ही स्थिती विशेषतः कठीण ठरण्याची शक्यता आहे.

 मेष राशी: मेष राशीच्या लोकांनी या काळात अत्यंत सावध राहणे आवश्यक आहे. शनि वक्री असल्यामुळे अनावश्यक खर्च वाढू शकतो. आर्थिक स्थिती डळमळीत होऊ शकते. वैयक्तिक आयुष्यात मतभेद, मनमुटाव आणि तणाव निर्माण होऊ शकतो. आरोग्याचाही प्रश्न उद्भवू शकतो.

मिथुन राशी: मिथुन राशीच्या लोकांनी गुंतवणुकीपासून दूर राहावे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे. आर्थिक तंगीमुळे मानसिक अस्वस्थता वाढू शकते. मोठे निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करणे आवश्यक आहे.

वृश्चिक राशी: वृश्चिक राशीसाठी शनि वक्री काळ मानसिकदृष्ट्या अस्थिर करणारा ठरू शकतो. मन सतत अशांत राहू शकते. चुकीचे निर्णय नुकसानदायक ठरू शकतात. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक बाजू कमकुवत होण्याची चिन्हं आहेत.

उपाय काय?

या काळात शनि उपासना, शनिवारी हनुमान चालिसा वाचन, शनी मंदिरात तेल अर्पण करणे, गरीबांना अन्नदान आणि काळे वस्त्र किंवा तीळ दान करणे हे उपाय उपयुक्त ठरू शकतात.

(Disclaimer: वरील सर्व माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून जय महाराष्ट्र कोणताही दावा करत नाही किंवा कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारत नाही.) 


सम्बन्धित सामग्री