Sunday, January 25, 2026 07:58:15 AM

Sheetal Tejwani: रणबीर कपूरविरुद्ध शीतल तेजवानीची कोर्टात धाव; करारभंग प्रकरणी 50 लाखांची मागणी

पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेली शीतल तेजवानी आता रणबीर कपूरविरुद्ध भाडेकरार भंगाचा आरोप करत 50 लाख 40 हजार रुपयांच्या नुकसानभरपाईच्या दाव्यामुळे चर्चेत आली आहे.

sheetal tejwani रणबीर कपूरविरुद्ध शीतल तेजवानीची कोर्टात धाव करारभंग प्रकरणी 50 लाखांची मागणी

पुणे: मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेली शीतल तेजवानी आता नव्या दाव्यामुळे चर्चेत आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शीतल तेजवानीने अभिनेता रणबीर कपूरविरुद्ध भाडेकरार भंग केल्याचा आरोप करत नुकसानभरपाईची मागणी केली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, पुण्यातील रणबीर कपूरच्या अपार्टमेंटमध्ये तिला करारात नमूद केलेल्या लॉक-इन कालावधीपूर्वीच घर खाली करण्यास भाग पाडण्यात आले.

शीतल तेजवानीने रणबीर कपूरच्या ट्रम्प टॉवर्समधील फ्लॅट संदर्भात दाखल केलेल्या दाव्यात 50 लाख 40 हजार रुपयांची नुकसानभरपाई आणि त्यावर व्याजाची मागणी करण्यात आली आहे. तिचा आरोप असा की, भाडेकरारातील अटींचे पालन न झाल्यामुळे तिला आर्थिक नुकसान सहन करावे लागले. याबाबतचा दावा सध्या पुणे दिवाणी न्यायालयात सुनावणीसाठी दाखल आहे.

हेही वाचा: Microsoft India Investment: भारतामध्ये मायक्रोसॉफ्टची सर्वात मोठी गुंतवणूक! एआय क्षेत्रात तब्बल 17.5 अब्ज डॉलर्सची घोषणा

दुसरीकडे, मुंढव्यातील 40 एकर जमीन खरेदीतील मोठ्या गैरव्यवहारप्रकरणी शीतल तेजवानीला काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी अटक केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी ही जमीन खरेदी करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली असून, या व्यवहारात अनेक अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वी पोलिसांनी शीतल तेजवानीची दोनदा चौकशी केली होती. चौकशीत उघड झालेल्या माहितीवरून तिचा या जमीन गैरव्यवहारात थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली.

पोलिसांचा दावा आहे की तेजवानी या व्यवहारातील मुख्य सूत्रधार असल्याचे पुरावे त्यांच्या हाती लागले आहेत. रणबीर कपूरविरुद्ध दाखल केलेला दावा आणि दुसरीकडे तिच्याच विरोधात सुरू असलेला भूखंड गैरव्यवहाराचा तपास या दोन्ही घटना एकाच वेळी चर्चेत आल्याने शीतल तेजवानीवर न्यायालयीन आणि गुन्हेगारी चौकशीचे दुहेरी संकट निर्माण झाले आहे.

हेही वाचा: World Most Expensive Book: बापरे! पुस्तकाची किंमत चक्क 15 कोटी, असं काय आहे यात?


सम्बन्धित सामग्री