SC On Shiv Sena : शिंदे की ठाकरे, धनुष्यबाण कोणाचं? सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी पुढे ढकलली; आता ‘या’ दिवशी होणार फैसला

सरन्यायाधीशांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, आता शुक्रवारी या प्रकरणावर महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे.

SC On Shiv Sena : शिंदे की ठाकरे, धनुष्यबाण कोणाचं? सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी पुढे ढकलली; आता ‘या’ दिवशी होणार फैसला

SC On Shiv Sena : शिवसेना कोणाची आणि 'धनुष्यबाण' या चिन्हावर अधिकार कोणाचा, या प्रलंबित वादाचा पेच आज सुप्रीम कोर्टात सुटू शकला नाही. सरन्यायाधीशांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, आता शुक्रवारी या प्रकरणावर महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनीच हा ऐतिहासिक युक्तिवाद पार पडणार असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.

आज सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाच्या यादीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित प्रकरणे 37 व्या क्रमांकावर होती. मात्र, वेळेच्या अभावामुळे यावर चर्चा होऊ शकली नाही. सरन्यायाधीश सूर्यकांत आज केवळ दुपारी 1 वाजेपर्यंतच नियमित कामकाज पाहणार होते. त्यानंतर ते 'अरवली डोंगररांगा' प्रकरणाच्या विशेष सुनावणीत व्यस्त असल्याने शिवसेना प्रकरणाला पुरेसा वेळ देणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नव्हते, त्यामुळे ही सुनावणी लांबणीवर पडली.

हेही वाचा – Vijay Wadettiwar : 'झालं गेलं आता गंगेला…'; प्रतिभा धानोरकरांसोबतच्या वादावर विजय वडेट्टीवार यांचं सूचक वक्तव्य

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी होणार फैसला

आता या प्रकरणाची पुढील तारीख शुक्रवारी, 23 जानेवारी रोजी निश्चित करण्यात आली आहे. सकाळी 11 वाजता सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर यावर सविस्तर चर्चा होईल. योगायोगाने याच दिवशी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असल्याने, त्यांच्याच पक्षाच्या अस्तित्वाचा आणि चिन्हाचा लढा न्यायालयात लढला जाणार आहे. हा योगायोग शिवसैनिकांसाठी अत्यंत भावूक आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानला जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या कायदेशीर युद्धात आता अंतिम निकालाची प्रतीक्षा असून, शुक्रवारी होणारी सुनावणी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. या सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते, यावरच शिवसेनेच्या भविष्यातील वाटचालीचे चित्र स्पष्ट होईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number