Monday, June 23, 2025 11:25:41 AM

शिरसाटांनी शेंद्रा एमआयडीसीची 5 एकर जागा घेतली; इम्तियाज जलील यांचा मंत्री शिरसाटांवर थेट आरोप

इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाटांवर गंभीर आरोप केला आहे. शिरसाटांनी शेंद्रा एमआयडीसीची पाच एकर जागा घेतली असल्याचा आरोप त्यांनी केला.

शिरसाटांनी शेंद्रा एमआयडीसीची 5 एकर जागा घेतली इम्तियाज जलील यांचा मंत्री शिरसाटांवर थेट आरोप

छत्रपती संभाजीनगर: इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाटांवर गंभीर आरोप केला आहे. शिरसाटांनी शेंद्रा एमआयडीसीची पाच एकर जागा घेतली असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच विट्स हॉटेल प्रकरण महाराष्ट्रासाठी संपलेलं नसल्याचं म्हणत जलील यांनी शिरसाटांवर निशाणा साधला आहे.   

काही दिवसांपूर्वी विट्स हॉटेल प्रकरण समोर आले होते. मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाने विट्स हॉटेल लिलाव प्रक्रियेतून घेतले. त्या हॉटेलची किंमत 110 कोटी होती. परंतु शिरसाटांच्या मुलाल ते 67 कोटींमध्ये विट्स हॉटेल विकत घेतले. हॉटेलच्या किंमतीत इतक्या कोटींची तफावत पाहून विरोधकांनी मंत्री शिरसाटांवर टीकेचा वर्षीव केला. त्यानंतर आता पुन्हा नवे प्रकरण समोर आले आहे. शिरसाटांनी शेंद्रा एमआयडीसी पाच एकर जागा घेतल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी त्यांच्यावर केला. यामुळे राजकीय चर्चांणा उधाण आले आहे. 

हेही वाचा : ठाकरे बंधू एकत्र येणार? संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

शिरसाटांवर गंभीर आरोप 
शिरसाटांनी शेंद्रा एमआयडीसीत (MIDC)  कोट्यवधींची जागा घेतली. ट्रक टर्मिनलची जागा आरक्षण बदलून घेतली असा गंभीर आरोप जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर केला. सिद्धांत शिरसाटांनी केमिकल उत्पादनासाठी जागा घेतली. फूड प्रोसेसिंगसाठी परवानगी मागितली. 26 कोटी स्वत: देणार होते, 79 कोटी कर्ज घेणार होते मात्र शिरसाट 26 कोटी कुठून आणणार होते ? असा सवाल जलील यांनी केला. शिरसाटांसाठी जागेचं आरक्षण का काढलं? असं म्हणत जलील यांनी प्रश्नांची मालिका सुरु केली. शिरसाटांना बांधकाम, कृषीतून किती उत्पन्न मिळतं? असा सवाल जलील यांनी केला. या प्रश्नांच्या माध्यमातून त्यांनी मंत्री शिरसाटांवर ताशेरे ओढण्याचे काम केले. आरक्षणात बदलली तेवढीच जागा शिरसाटांनी मागितली. एमआयडीसीच्या जागेसाठी अधिकाऱ्यांना 2 कोटी दिले असल्याचेही जलील यांनी म्हटले.                


सम्बन्धित सामग्री