रत्नागिरी : जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये रत्नागिरी जिल्हा परिषद सर्वाधिक चर्चेत राहिली. रत्नागिरीतील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर या बहुचर्चित निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाने वर्चस्व निर्माण केल्याचे स्पष्ट झाले आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 56 निवडणूक विभागांसह 9 पंचायत समित्यांतील 112 गणांसाठी शनिवार, 7 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. तर आज, सोमवारी या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये विविध गटांतील विजयी उमेदवारांची नावे समोर आली आहेत. निकालांनुसार शिवसेना (शिंदे गट) अनेक ठिकाणी आघाडीवर राहिली आहे. तर ठाकरे गट, भाजप, मनसे तसेच काही बंडखोर उमेदवारांनीही काही गणांमध्ये विजय मिळवला आहे.
हेही वाचा : Sindhudurg ZP Election Results 2026: सत्ता महायुतीची, चर्चेत बंडखोर! सिंधुदुर्ग जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत अपक्षांचा अनपेक्षित प्रभाव; वाचा विजयी उमेदवारांची यादी
रत्नागिरी जिल्हा परिषद निकाल अंतिम आकडेवारी -
भाजप - 04
शिवसेना - 40
राष्ट्रवादी अजित पवार गट- 5
शिवसेना ठाकरे गट - 6
मनसे - 1
काँग्रेस -
राष्ट्रवादी शरद पवार गट -0
अपक्ष - 0
एकूण जागा : 56