Rajya Sabha Elections : शिवसेनेच्या आक्रमक, अभ्यासू नेत्या ज्योती वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी?, सेनेत अवघ्या दोन जागांसाठी अनेक दिग्गज नेते इच्छुक

मुंबई : राज्यसभेसाठी खासदारकीच्या पदाकरता देशभरातील बडे नेते इच्छुक असतानाच राज्यातही नेतेमंडळींची राज्यसभेसाठी फिल्डिंग लावली आहे. भाजपने आपली उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाकडूनही काही नावं समोर येत आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्योती वाघमारे, राहुल शेवाळे, संजय निरुपम, आनंदराव अडसूळ, गजानन किर्तीकर आदींच्या नावांची चर्चा आहे. या सर्व अनुभव नेत्यांच्या यादीत ज्योती वाघमारे हे […]

Rajya Sabha Elections : शिवसेनेच्या आक्रमक, अभ्यासू नेत्या ज्योती वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी?, सेनेत अवघ्या दोन जागांसाठी अनेक दिग्गज नेते इच्छुक

मुंबई : राज्यसभेसाठी खासदारकीच्या पदाकरता देशभरातील बडे नेते इच्छुक असतानाच राज्यातही नेतेमंडळींची राज्यसभेसाठी फिल्डिंग लावली आहे. भाजपने आपली उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाकडूनही काही नावं समोर येत आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्योती वाघमारे, राहुल शेवाळे, संजय निरुपम, आनंदराव अडसूळ, गजानन किर्तीकर आदींच्या नावांची चर्चा आहे. या सर्व अनुभव नेत्यांच्या यादीत ज्योती वाघमारे हे नाव नव्याने सामील झाले आहे. आपल्या आक्रमक शैलीने, अभ्यासू वक्तव्यांनी विरोधकांना खडेबोल सुनावणाऱ्या ज्योती वाघमारे यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.   

हेही वाचा : Nitish Kumar Resignation: बिहारमध्ये सत्तांतराचे वारे, नितीश कुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; आता दिल्लीच्या राजकारणात एन्ट्री

निवडणूक आयोगाने 10 राज्यांमधील 37 राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. या 37 जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणुका होणार आहेत. रिक्त जागांपैकी 12 जागांवर एनडीए आहे, तर 25 जागांवर विरोधी पक्षांचा समावेश आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक (7) जागा आहेत, त्यानंतर तामिळनाडू (6) आणि पश्चिम बंगाल आणि बिहार (प्रत्येकी 5) आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number