Sunday, July 13, 2025 09:35:37 AM

पती, सासू आणि नणंदेकडून विवाहितेला वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर

बुलढाणा जिल्ह्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. एका विवाहित महिलेला वेश्याव्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या आठ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

पती सासू आणि नणंदेकडून विवाहितेला वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. एका विवाहित महिलेला वेश्याव्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या आठ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मुख्य म्हणजे कुटुंबातील लोकांनी महिलेला त्रास दिला आहे.   

32 वर्षीय विवाहितेला जबरदस्तीने वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करून घरात डांबून ठेवून दोन दिवस बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, याप्रकरणी पीडित महिलेने जानेफळ पोलीस ठाण्यात पती, सासू आणि नणंद यांच्यासह इतर पाच अशा एकूण आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पती, सासू आणि नणंद यांनी मिळून आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलेला वेश्याव्यवसाय करण्यासाठी जबरदस्ती केली. महिलेने नकार दिल्याने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. तसेच पती आणि नणंद यांच्या सांगण्यावरून इतर आरोपींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे पीडित महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जानेफळ पोलीस अधिकचा तपास करत आहेत. 

हेही वाचा: Mumbai Local: महिलांची लोकलमधील फ्रिस्टाईल हाणामारी व्हायरल

बुलढाण्यात एका विवाहित महिलेचा मानसिक आणि शारिरीक छळ केल्याचे समोर आले आहे. वेश्याव्यवसाय करण्यासाठी हा छळ करण्यात आल्याचे समोर आले. वेश्याव्यवसाय करण्यास महिलेने नकार दिल्याने पती आणि नणंदेने मिळून परक्या व्यक्तीला सांगून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित महिलेने ही संपूर्ण माहिती जानेफळ पोलिसांना सांगितली आहे. या प्रकारामुळे बुलढाण्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणी पती, सासू आणि नणंद यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

माहेरनंतर सासर हे प्रत्येक मुलीचं दुसरं घर असतं. परंतु सासरी म्हणजेच दुसऱ्या घरीही मुली सुरक्षित नसल्याचे दिसून आले आहे. प्रत्येक मुलीचे आई वडिल किती विश्वासाने आपल्या मुलीला सासरी पाठवतात. मात्र सासरी तिच्यासोबत असे काही होत असेल तर कुठल्याच आई वडिलांचा सासरच्या लोकांवर विश्वास बसणार नाही. वारंवार महिलांच्या अत्याचाराच्या घटना समोर येणं समाजासाठी घातक आहे. प्रशासनाने अशा घटनांवर आळा बसवण्यासाठी समुपदेशनासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नाहीतर महिला त्यांच्या घरीही सुरक्षित राहणार नाहीत. 
 


सम्बन्धित सामग्री