Friday, March 13, 2026 10:08:00 PM

Chhatrapati Sambhajinagar : “तू कोणाला बोलशील तर…”, धमकी देत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील एका गावात 16 वर्षीय मुलीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार करुन तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

chhatrapati sambhajinagar  “तू कोणाला बोलशील तर…” धमकी देत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील एका गावात 16 वर्षीय मुलीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार करुन तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिडीतेला मुलगा झाल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. दिगंबर जयवंता गव्हाणे वयवर्षे 60 असे या प्रकरणातील आरोपीचे नाव असून आरोपी विरोधात करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान या अत्याचाराची सुरुवात 2025 मध्ये गणपती उत्सवाच्या काळात झाली. त्यावेळी दुपारी पीडिता एकटी असताना आरोपीने घराचा दरवाजा बंद करून, तिला जीवे मारण्याची धमकी दिली व तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. यापूर्वीही मे, जून आणि जुलै 2025 या महिन्यांत आरोपीने पीडितेच्या घरीच वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आरोपीचे फिर्यादीच्या घरी नियमित येणे जाणे होते असे देखील तक्रारीत म्हटले आहे. 

हेही वाचा- Chhatrapati Sambhajinagar Crime : आधी खेचत कोपऱ्यात नेलं आणि मग...; छत्रपती संभाजीनगरमधील तरुण-तरूणीचा Video Viral
या घटनेनंतर आरोपीने पीडिता तसेच तिचे आई-वडील व भावाला जीवे मारण्याची धमकी देत दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. त्यामुळे पीडिता बराच काळ गप्प राहिली. मात्र 1 फेब्रुवारी रोजी पहाटे अचानक पोटदुखी सुरू झाल्याने कुटुंबीयांनी तिला प्रथम एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. प्रकृती गंभीर असल्याने पुढे छत्रपती संभाजीनगर शहरात तिला हलविण्यात आले. उपचारादरम्यान पीडितेची प्रसूती होऊन तिला मुलगा झाला. त्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात 2 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाची सूत्रे पोलीस उपनिरीक्षक काळे यांनी हाती घेतली आहेत. गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलीस उपनिरीक्षक दगडू तडवी यांनी केली. पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत व पोउपनि. दगडू तडवी यांनी घटनास्थळांची पाहणी केली. या प्रकरणी करमाड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.


सम्बन्धित सामग्री