पुणे: ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी 52 वर्षीय बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग रुग्णावर यशस्वीरित्या लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांच्या अन्ननलिकेत तब्बल सहा मोठ्या मासांची हाडं अडकली होती. सध्या रुग्ण सुखरूप असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोल्हापूरमधील रुग्णाला जेवताना मटणाचा घास चावता न आल्यामुळे त्यांच्या घशात मटणाची हाडं अडकली होती. या कारणामुळे, त्यांना उलट्या आणि घसा दुखू लागला. तसेच, स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार होत नसल्यामुळे त्यांना तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
हेही वाचा: आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये हल्लाबोल महामोर्चा
त्यानंतर, ससून रुग्णालयातील कान, नाक आणि घसा शस्त्र विभागात त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. विशेष बाब म्हणजे सीटी स्कॅनमध्ये अन्ननलिकेच्या वरच्या भागात सहा हाडे अडकल्याचे आढळले. हाडांची संख्या आणि विविध आकार पाहता हे निष्पन्न नष्ट झाल्यामुळे ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती. प्राध्यापक आणि विभाग प्रमुख डॉ. राहुल तेलंग, तसेच डॉ. राहुल ठाकूर, डॉ. प्रणीत खंडागळे, डॉ. आकृती नेमाणी, डॉ. प्रियांका शिंदे आणि इतर डॉक्टरांच्या मदतीने दुर्बिणीच्या माध्यमांतून ‘ईसोफॅगोस्कॉपी’ करून यशस्वीपणे मटणाची हाडं बाहेर काढण्यात यश मिळाले.