राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना उत्तर देत लाडकी बहीण योजना आणि शेतकरी कर्जमाफीवर मोठी घोषणा केली आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, "फक्त रोजगारच नाही, शेतकऱ्यांसाठीच्या योजना, उद्योग वाढ, आरोग्य योजना, लाडक्या बहिणींच्या योजना हे सगळ आम्ही आणलं. मी मुख्यमंत्री असताना एनडीआरएफचे निकष बाजूला केले. एनडीआरएफच्या दुप्पट आम्ही देऊ लागलो. दोन हेक्टरचं आम्ही तीन हेक्टर देऊ लागलो. सततच्या पावसामुळे होणारं नुकसान भरून देऊ लागलो. अगदी गोगलगाईने केलेलं नुकसान देखील आम्ही भरून दिलं आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं, तेव्हा आम्ही म्हणालो होतो की, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. दिवाळीच्या आधी त्यांच्या खात्यात पैसे गेले. 32 हजार कोटींच पॅकेज आम्ही तेव्हा घोषित केलं होत आणि ते दिलं सुद्धा.. एकही पात्र महिलेला आम्ही लाडकी बहीण योजनेपासून वंचित ठेवणार नाही... योग्य वेळ आली की आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यात एकविशे रुपये जमा करणार. आम्ही दिलेला एकही शब्द खोटा पाडू देणार नाही. आम्ही प्रिंटींग मिसटेक वाले नाही. त्यामुळे आम्ही योग्यवेळी शतकऱ्यांची कर्ज माफी देखील करणार, त्यासाठी परदेशी कमिटी आणि कमिटी नेमलेली आहे. 30 जूनला त्याचा अहवाल देणार आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांना देखील आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही".
हेही वाचा- Maharashtra Budget Session: दरवर्षी 10 लाख रोजगार अन् 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा संकल्प...मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडले महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन
शिंदेंचा विरोधकांवर घणाघात
"मुंबई तोडणारे फेक नेरेटिव्ह विरोधक पसरत होते पण मुंबईकरांनी आम्हाला पोचपावती दिली. मी मुख्यमंत्री झाल्यावर खड्डे मुक्त मुंबई करण्याचा संकल्प आम्ही केला. वीस पंचवीस वर्षात साधा एसटीपी प्लान नव्हते. पुस्तके सरकार नाही तर हे प्रगती सरकार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी एक चांगलं उत्तर यांना दिलं. जगभरातले लोक मुंबईत आणून मुंबईचे महत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा आहे. मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी हे स्वप्न बघणाऱ्यांना मुंबईकरांनी घरी बसवल... अनिल परब येथे नाहीयेत त्यांनी किल्ला लढवण्याचा खूप प्रयत्न केला पण जनतेने त्यांचा किल्ला उध्वस्त केला. तो मारतो जनतेच्या तिजोरीवर डल्ला जनता त्यांचा किल्ला उध्वस्त करते. शेतकऱ्यांना मी कधी वाऱ्यावर सोडणार नाही राज्याच्या तिजोरीवर सगळ्यात पहिला अधिकार शेतकऱ्याचा आहे. भारत मंडप मध्ये जगातले लोकांनी भारताचा साम्राज्य बघितलं. अरे तिथे काँग्रेस वाले चड्डी बनियान गॅंगमध्ये घुसले. आपल्या देशाचा अपमान करण्याचा प्रयत्न तिथे केला. हा देशद्रोह आहे."