Friday, July 11, 2025 11:35:01 PM

पायी जाणे अशक्य, 'लालपरी' घडवतेय वारी; एसटीत 'विठुनामाचा जयघोष'

आषाढी वारीसाठी संभाजीनगर जिल्ह्यातून 33 एसटी बस पंढरपूरकडे रवाना; जेष्ठ नागरिक व महिलांना सवलतीसह प्रवासाची सुविधा, 8 आगारांतून 135 जादा बसेसचे नियोजन.

पायी जाणे अशक्य लालपरी घडवतेय वारी एसटीत विठुनामाचा जयघोष

विजय चीडे, प्रतिनिधी. छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरकडून आषाढी वारीसाठी हजारो वारकरी पंढरपूरकडे पायी निघाले आहेत. मात्र, अनेकांना पायी जाणे शक्य होत नाही. अशा वारकऱ्यांची 'लालपरी' म्हणजे एसटी बस वारी घडवत आहे. 'पांडुरंग, पांडुरंग', 'विठ्ठल, विठ्ठल' असा विठुनामाचा जयघोष करत गुरुवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातून 33 एसटी पंढरपूरसाठी रवाना झाल्या.

एसटी महामंडळाकडून पंढरपूर यात्रेसाठी 2 जुलैपासून जिल्ह्यातील 8 आगारांतून 135 जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संतोष घाणे यांनी दिली. पंढरपूरला एसटीने जाणाऱ्या भाविकांची संख्या ही शुक्रवारी आणि शनिवारी वाढेल. त्यानुसार एसटी महामंडळाने बसेस सज्ज ठेवल्या आहेत. मध्यवर्ती बसस्थानकात भाविकांच्या सुविधेसाठी मंडप टाकण्यात आला आहे.

हेही वाचा: Pandharpur Wari 2025: वारीला जाता आलं नाही? हरकत नाही, विठोबा येईल तुमच्या घरी; जाणून घ्या कसं

कोणाला मोफत, कोणाला सवलत?

एसटी बसमधून 75 वर्षावरील ज्येष्ठ प्रवाशांना अगदी मोफत प्रवास करता येतो, तर 65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठांना तिकिटात 50 टक्के सवलत दिली जाते. महिलांनाही 50 टक्के सवलत दिली जाते.

पंढरपूरसाठी कोणत्या आगारातून किती बस?

•सिडको बसस्थानक- 30 बस 

•मध्यवर्ती बसस्थानक - 25 बस

•पैठण-20 बस 

•सिल्लोड-20 बस

•वैजापूर- 10 बस

•कन्नड-10 बस

•गंगापूर-10 बस

•सोयगाव-10 बस


सम्बन्धित सामग्री