MSRTC New Campaign: ST चा होणार कायापालट! 1 मे पासून ‘आपली बस, आपली सेवा’ अभियान सुरू; प्रवाशांना काय होणार फायदा ?

एसटी महामंडळाने प्रवासी सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी 1 मे 2026 पासून “आपली बस आपली सेवा” हे विशेष अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

MSRTC New Campaign: ST चा होणार कायापालट! 1 मे पासून ‘आपली बस, आपली सेवा’ अभियान सुरू; प्रवाशांना काय होणार फायदा ?

MSRTC New Campaign: 'लालपरी'चा प्रवास आता अधिक स्मार्ट, शिस्तबद्ध आणि प्रवासीस्नेही होणार आहे. एसटी महामंडळाने प्रवासी सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी 1 मे 2026 पासून “आपली बस आपली सेवा” हे विशेष अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या उपक्रमाची अधिकृत घोषणा केली.

अभियानामागची भूमिका
बसेसची संख्या वाढूनही अपेक्षित महसूल आणि प्रवासी संख्या वाढत नसल्याचे निरीक्षण महामंडळाने नोंदवले आहे. प्रवाशांचा 'लालपरी'वरील विश्वास वाढवण्यासाठी आणि सेवेमध्ये व्यावसायिकतेसोबतच माणुसकी जपण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

काय आहेत या अभियानाची वैशिष्ट्ये?
संवाद आणि सौजन्य: आता चालक केवळ बस चालवणार नाहीत, तर प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी ते आपली ओळख करून देतील. प्रवासाचा मार्ग, प्रमुख थांबे आणि वेळ याची माहिती प्रवाशांना दिली जाईल, जेणेकरून प्रवाशांशी एक विश्वासाचे नाते तयार होईल.

शिस्त आणि स्वच्छता: बस फलाटावर येण्यापूर्वी तिची पूर्ण स्वच्छता, कर्मचाऱ्यांचा नीटनेटका गणवेश आणि वेळेचे पालन या गोष्टींना प्राधान्य दिले जाणार आहे.

प्रवाशांचा सहभाग: प्रवासादरम्यान स्वच्छता राखणे, रांगेत उभे राहणे आणि ऑनलाइन आरक्षणासह NCMC स्मार्ट कार्डचा वापर करण्यासाठी प्रवाशांनाही प्रोत्साहित केले जाणार आहे.

तत्पर पर्याय: प्रवासात बस नादुरुस्त झाल्यास किंवा फेरी रद्द झाल्यास प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

हेही वाचा – Riteish Deshmukh : 'महाराजांबाबत आक्षेपार्ह शब्द खपवून घेणार नाही', धीरेंद्र शास्त्रींसह संजय गायकवाडांना यांच्या विधानावर अभिनेता रितेश देशमुख यांचं वक्तव्य

तक्रार निवारणासाठी स्वतंत्र यंत्रणा
प्रवाशांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी एक विशेष निवारण कक्ष कार्यान्वित केला जाईल. प्राप्त तक्रारींवर केवळ कागदोपत्री कारवाई न करता, त्या प्रत्यक्ष सोडवण्यावर भर दिला जाईल. बसस्थानकांवरील सोयीसुविधा आणि सुरक्षेचा दर्जा सुधारण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. 1 मे पासून सुरू होणारे हे अभियान म्हणजे एसटीचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न आहे. "लालपरीच्या प्रवासाला आता संवेदनशीलतेची जोड मिळणार असून, प्रत्येक प्रवाशाचा प्रवास सन्मानजनक व्हावा, हेच आमचे उद्दिष्ट आहे," असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number