विलासराव देशमुख रुग्णालयात ‘नूतन बाह्यरुग्ण विभाग’ तात्काळ सुरू करा – डॉ. अजय चंदनवाले यांचे निर्देश

लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची राज्य वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांनी अनपेक्षित भेट देऊन तपासणी केली.

विलासराव देशमुख  रुग्णालयात ‘नूतन बाह्यरुग्ण विभाग’ तात्काळ सुरू करा – डॉ. अजय चंदनवाले यांचे निर्देश

प्रतिनिधी,अजय घोडके – लातूर: लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची राज्य वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांनी अनपेक्षित भेट देऊन तपासणी केली. या पाहणी दौऱ्यात त्यांनी रुग्णालयातील काही गंभीर त्रुटींवर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले. परराज्य आणि परजिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी येतात. त्यामुळे नवीन ‘बाह्यरुग्ण विभाग’ त्वरीत सुरु करून रुग्णांची गैरसोय टाळावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी निर्देश दिले आहेत. 

रुग्णालय व महाविद्यालयात अनेक कर्मचारी गेल्या तीन वर्षांपासून एकाच पदावर कार्यरत आहेत. हे लक्षात घेता, योग्य त्या ठिकाणी नव्या पात्र उमेदवारांची नेमणूक करून सामान्य प्रशासन विभागाच्या नियमांचे पालन करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. स्त्रीरोग विभागात स्वच्छतेचा अभाव जाणवत असल्याने तिथे विशेष स्वच्छता मोहिम राबवावी, तर साहित्य पुरवठा करणाऱ्या एजन्सींची माहिती पूर्ण पारदर्शकपणे ठेवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सुपर स्पेशालिटी विभागात होणाऱ्या शस्त्रक्रियांची माहिती स्पष्ट आणि रुग्णांना समजेल अशा पद्धतीने दाखवावी, यासाठी एक माहिती फलक दर्शनी भागात लावावा, असा आदेशही त्यांनी दिला. रुग्णालय परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार स्पष्ट झाले असून, याची गंभीर दखल घेत त्यांनी सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. रुग्णसेवा अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत, असा ठाम संदेश त्यांनी दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number