Bandra Demolition: वांद्रे झोपडपट्टी अतिक्रमण प्रकरणात पोलिसांवर दगड फेक! यात 3 पोलिस कर्मचारी जखमी तर 7 आरोपींना ताब्यात

पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून वांद्रे येथे सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाई दरम्यान पोलीस लाठीचार्ज  सुरु करताच काही नागरिकांकडून पोलिसांवर दगड फेक करण्यात आले. या दगडफेकीमध्ये 3 पोलिस कर्मचारी जखमी झाले.

Bandra Demolition: वांद्रे झोपडपट्टी अतिक्रमण प्रकरणात पोलिसांवर दगड फेक! यात 3 पोलिस कर्मचारी जखमी तर 7 आरोपींना ताब्यात

उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, कालपासून वांद्रे रेल्वे परिसरातील अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी अतिक्रमण करण्यात आले. आज या अतिक्रमणाचा दुसरा दिवस होता. दरम्यान अतिक्रमण करते वेळी वांद्रे पूर्व स्टेशन परिसरातील अतिक्रमण काढत असताना यात एक मशीद देखील पडण्यात आली. त्यावेळी जमाव क्षुब्ध झाला आणि पोलिसांवर पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक साहित्य आणि दगड फेक करू लागला. यात काही युवकही अग्रेसिव्ह झाले त्यांच्यावरही पोलिसांनी लाठीचर्ज केला.

हेही वाचा- Bandra Demolition: वांद्र्यातील अतिक्रमणावर तोडक कारवाई! बाटल्या आणि दगड फेक करत कारवाईला विरोध; पोलिसांकडून लाठीचार्ज

यावेळी पोलिसावर पाणी आणि बॉटल फेकण्यात महिलांचे प्रमाण जास्त होते. यावेळी परिस्थिती पाहता पोलिसांनी जमावाला हटवण्याचा प्रयत्न केला परंतु ते ऐकत नसल्यामुळे पोलिसांना सौम्य लाटीचार्ज करावा लागला. पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून वांद्रे येथे सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाई दरम्यान पोलीस लाठीचार्ज  सुरु करताच काही नागरिकांकडून पोलिसांवर दगड फेक करण्यात आले. या दगडफेकीमध्ये 3 पोलिस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तसेच पोलिसांनी दगड फेक करणाऱ्या 7 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या संदर्भात ड्रोन द्वारे घटनेची माहिती घेऊन ज्या नागरिकांनी या दरम्यान पोलिसांवर दगड फेक केली त्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच पुढील 3 दिवस अतिक्रमण कारवाई सुरू राहणार अशी माहिती पश्चिम रेल्वे जनसंपर्क अधिकारी यांनी दिली आहे. पोलिसांनी वांद्रे स्टेशन परिसरातून सर्वांना बाहेर काढलं असून वांद्रे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली पण पोलिसांनी ती नियंत्रणात आणली.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number