Wednesday, June 18, 2025 02:17:10 PM

मोकाट कुत्र्यांचा 6 वर्षीय चिमुकल्यावर हल्ला; जखमी मुलावर खाजगी रूग्नालयात उपचार सुरू

पुण्यातील शिरुर शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळत आहे. मोकाट कुत्र्यांचा सहा वर्षीय चिमुकल्यावर हल्ला केला असून जखमी मुलावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मोकाट कुत्र्यांचा 6 वर्षीय चिमुकल्यावर हल्ला जखमी मुलावर खाजगी रूग्नालयात उपचार सुरू

पुणे : पुण्यातील शिरुर शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळत आहे. मोकाट कुत्र्यांचा सहा वर्षीय चिमुकल्यावर हल्ला केला असून जखमी मुलावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  

पुणे जिल्ह्याच्या शिरूर शहरात भटक्या मोकाट कुत्र्यांची दहशत वाढत चालली आहे. गुजरमळा येथे भटक्या मोकाट कुत्र्यांनी सहा वर्षाच्या चिमुकल्या मुलावर जीवघेणा हल्ला केला आहे. हल्ल्यात इशांत दारोळे नामक चिमुकला मुलगा गंभीर जखमी झाला आहे. जखमी मुलावर अहिल्यानगर येथील खाजगी रूग्नालयात उपचार सुरू आहेत. जिवघेण्या हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. गुजरमळा परिसरात भटक्या मोकाट कुत्र्यांची दहशत मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे. गेल्या दोन वर्षात आत्तापर्यंत 17 मुलांचा आणि नागरिकांचा मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला. भटक्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली.

हेही वाचा : शिक्षक भरती घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करावी; शिक्षक आमदार अडबालेंची मागणी

भटक्या कुत्र्याने चावल्यावर अनेक समस्या होऊ शकतात. यामध्ये संसर्ग (Infection), टिटॅनस (Tetanus) आणि रेबीज (Rabies) यासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास हे आजार जीवघेणे देखील ठरू शकतात. 

भटक्या कुत्र्याने चावल्यावर काय होऊ शकते?
संसर्ग: भटक्या कुत्र्यांच्या लाळेत अनेक जीवाणू असू शकतात. ज्यामुळे चावलेल्या जागी संसर्ग होऊ शकतो. 
टिटॅनस: टिटॅनस हा एक जीवाणूजन्य आजार आहे. जो कुत्र्याच्या चाव्यामुळे होऊ शकतो. 
रेबीज: रेबीज हा एक विषाणूजन्य आजार आहे. जो कुत्र्याच्या चाव्यामुळे माणसांमध्ये पसरू शकतो. हा आजार गंभीर असून वेळीच उपचार न मिळाल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. 


सम्बन्धित सामग्री