महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतलेला आहे. आता विद्यार्थ्यांनी NCMC हे स्मार्ट कार्ड घेण्यासाठी एसटी डेपो किंवा ई-सेवा केंद्रात जाण्याची गरज भासणार नाही. कारण या कार्डची संपूर्ण नोंदणी प्रक्रिया ही विद्यार्थ्यांना थेट शाळेच्या आवारातच पूर्ण करता येणार आहे. या नव्या सुविधेमुळे असंख्य विद्यार्थी आणि पालकांचा वेळ, पैसा दोन्ही वाचणार आहेत.
शालेय विद्यार्थ्यांसाठी खुशखबर
महामंडळाचे अधिकृत कर्मचारी स्वत: शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे फॉर्म भरुन घेणार असून नोंदणी पूर्ण ही करणार आहेत, त्यामुळेच विद्यार्थ्यांनी रांगेत उभे राहण्याचा त्रास पूर्णपणे संपणार असून प्रवास सवलतीचा लाभ हा घेणे आणखी सोपे होणार आहे. या अत्याधुनिक NCMC कार्डला विद्यार्थ्यांचा सरल आयडी लिंक हा केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती आणि त्याला मिळणाऱ्या सवलतीची संपूर्ण आवश्यक असलेली माहिती ही डिजिटल स्वरुपात सुरक्षित राहणार आहे.
महामंडळाने सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना याबाबत सतर्कतेचाही इशारा दिलेला आहे. शाळेकडूनच मिळणाऱ्या अधिकृत सूचनांनुसारच नोंदणी करावी. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला किंवा खाजगी केंद्राला आपले वैयक्तित कागदपत्रे देऊ नये, जेणेकरुन फसवणूक टाळता येईल.महत्त्वाचे म्हणजे ही योजना फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठीच नाही, तर अन्य सवलतधारक प्रवाशांसाठीही लागू राहणार आहे.
नव्या NCMC कार्डची किंमत?
नव्या NCMC कार्डची किंमत ही 199 रुपये ठेवण्यात आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे आधीपासूनच जुने स्मार्ट कार्ड आहे, त्यांनी ते जमा केल्यास त्यांना फक्त 149 रुपयांमध्येत नवीन कार्ड मिळेल. कार्ड घताना सुरुवातीस किमान तरी 100 रुपयांचा रिचार्ज करणे बंधनकारक असणार आहे. त्यानंतर 50 रुपयांच्या पटीत रिचार्ज करता येईल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.