Mumbai Local Megablock : लोकल प्रवासासाठी बाहेर पडताय? सांभाळून, दादरपर्यंत लोकल बंद; जाणून घ्या आजच वेळापत्रक

113 वर्ष जुना असलेला एलफिस्टन फुलाचे पाडकाम सुरू करण्यात आले आहे. यासाठी काल रात्री मध्य रेल्वेचा सगळ्यात मोठा मेगाब्लॉक घेण्यात आलेला पाहायला मिळाला आहे.

Mumbai Local Megablock : लोकल प्रवासासाठी बाहेर पडताय? सांभाळून, दादरपर्यंत लोकल बंद; जाणून घ्या आजच वेळापत्रक

113 वर्ष जुना असलेला एलफिस्टन फुलाचे पाडकाम सुरू करण्यात आले आहे. यासाठी काल रात्री मध्य रेल्वेचा सगळ्यात मोठा मेगाब्लॉक घेण्यात आलेला पाहायला मिळाला. रात्री साडेदहा वाजता सुरू झालेला हा मेगाब्लॉक सकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी संपल्याचे रेल्वे कडून जाहीर करण्यात आले. यादरम्यान शनिवारी रात्री 10.30 वाजल्यापासून ते रविवारी सकाळी 6 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत सीएसएमटी ते दादर रेल्वेस्थानक दरम्यानच्या उपनगरीय सेवा पूर्णपणे बंद राहतील.

हेही वाचा- Weather Update : राज्यात पावसाचा कहर कायम; ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा तडाखा

या मेगा ब्लॉकमुळे रेल्वेवर आणि मेल एक्सप्रेस वर देखील परिणाम झालेला पाहिला मिळाला होता. हा पूल हटवल्यानंतर ओव्हरहेड वायर (OHE)ची पुर्नजोडणी करण्यात आली अशी माहिती रेल्वेतर्फे देण्यात येत आहे. तसेच ठाणे आणि डोंबिवली यादरम्यान शनिवारी रात्री 12 वाजता सुरू होणारा ब्लॉक सकाळी 10 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. यावेळी ठाणे आणि डोंबिवली स्थानकावर आणि कोपर आणि ठाकुर्ली स्थानकावर लोकल थांबणार नसून दादर किंवा कुर्ला स्थानकावरून पुन्हा सुरू होतील. 

हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकांवर सकाळी 11:05 ते सायंकाळी 4:05 वाजेपर्यंत अप व डाऊन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी पनवेल ते सीएसएमटीच्या दरम्यानच्या लोकलसेवा रद्द राहतील. तर ट्रान्सहार्बर मार्गावर पनवेल-ठाणे दरम्यानच्या सेवा सकाळी 11:02 ते दुपारी 3:53 या वेळेत रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-वाशी विशेष उपनगरीय लोकल चालविण्यात येतील, तसेच ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांच्या दरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील. बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांच्या दरम्यान पोर्ट मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number