Friday, June 12, 2026 11:34:41 PM

Baramati Jay Pawar : 2029 ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होणार? जय पवारांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

बारामतीत झालेल्या पोट निवडणुकीत सुनेत्रा पवार रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून आल्या.

baramati jay pawar  2029 ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होणार जय पवारांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

बारामती: बारामतीत झालेल्या पोट निवडणुकीत सुनेत्रा पवार रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून आल्या. अजितदादांचं मताधिक्य राज्यात सर्वात जास्त मानले जात होते पण सुनेत्रा पवारांनी झालेल्या पोट निवडणुकीत सुनेत्रा पवारांनी दादांचा रेकॉर्ड तोडला. सुनेत्रा वहिनी तब्बल २, १८,०३४ विक्रमी मतांनी निवडून आल्या. जय पवारांनी निवडणुकीत सुनेत्रा  पवारांचा जोरात प्रचार केला होता. बारामतीच्या लोकांना दादा प्रचार करत आहेत असा भास देखील तेव्हा झाला होता.

दादांच्या अपघाती मृत्यूनंतर सुनेत्रा पवारांचा राजकारणात जोर वाढला.  राष्ट्रवादी काँग्रेसचे तेव्हा ते राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा होते. दादांनी मुख्यमंत्री व्हावं असं त्यांचं आणि संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाचं स्वप्न होतं पण दादांचं अपघाती निधन झालं आणि दादांचं स्वप्न तसंच राहिले.

जय पवार नक्की काय म्हणाले...

बारामतीमध्ये झालेल्या पोट निवडणुकीमध्ये सुनेत्रा वहिनींचा विक्रमी मतांनी विजय झाला. वहिनी फक्त बारामतीच्या नव्हे तर संपूर्ण राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार आहेत. दादांची जागा आता वहिनी घेत आहेत. 2029 ला वहिनी मुख्यमंत्री झाल्या पाहिजे, असं जय पवारांनी बोलून दाखवलं आहे.

2029 ला पवार विरुद्ध पवार सामना होणार?

दादाच्या अपघाती निधनानंतर बारामतीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली होती. पण सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यामुळे बारामतीमध्ये पोटनिवडणूक लागली आणि त्या तिकडून निवडून सुद्धा आल्या आहेत. 2029 ला पवार विरुद्ध पवार सामना होऊ शकते अशी शंका रोहित पवारांनी बोलून दाखवली होती. पण आता जय पवारांनी 2029 चं भाकीत बोलून दाखवलं आहे. त्यामुळे पुढे काय होणार हे औस्तुक्याचे राहणार आहे.


सम्बन्धित सामग्री