Tuesday, March 17, 2026 03:37:58 PM

Sunetra Pawar NSP : देवगिरीत झालेल्या बैठकीत प्रफुल पटेलांकडून मोठी घोषणा; सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी बैठक पार पडली. यादरम्यान आज राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

sunetra pawar nsp  देवगिरीत झालेल्या बैठकीत प्रफुल पटेलांकडून मोठी घोषणा सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष

आज संध्याकाळी 6 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, आमदार संजय खोडके देवगिरी निवासस्थानी दाखल झाले होते. यादरम्यान आज राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षबाबत मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा झाली आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी देवगिरी निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रीवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली. तसेच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या घोषणेनंतर सर्व आमदारांकडून देखील समर्थन देण्यात आलं. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडीची तारीख ठरली असून 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. 


सम्बन्धित सामग्री